MyMandirInstall

*⏹️ थंडी भरून ताप येणे, सर्दी खोकला* *१)* पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही घेऊ शकता. *२)* तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो. *३)* थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो. *४)* जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुकडा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो. *५)* बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो. *६)* तापात मनुके खाणे उपयुक्त असते. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे. *७)* आहारात सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा. *८)* कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो. *९)* तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो. संकलन : मिलिंद पंडित, कल्याण* *हा मेसेज वेळात वेळ काढून वाचावा आणि इतरांच्या माहितीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा 📲*

Post media

Comments (0)

No comments yet. Be the first to comment!