
Srikumar महाराज🇮🇳☸️
72 days ago
*ABC ज्यूस* By - Shree G हल्ली सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी काहीतरी हेल्दी प्यावे असे वाटत होते. मग एक दिवस मार्केटमध्ये ताजे लाल बीट, गाजर आणि सफरचंद दिसले आणि लगेच ABC Juice बनवायचे ठरवले. गेल्या वर्षी पहिल्यांदा बनवून पाहिला आणि खरंच इतका फ्रेश वाटला की आता अधूनमधून सकाळची सुरुवात याच ज्यूसने करते. *ABC Juice म्हणजे काय?* �A म्हणजे Apple 🍎 �B म्हणजे Beetroot ❤️ �C म्हणजे Carrot 🥕 हे तिन्ही पदार्थ शरीरासाठी खूप पौष्टिक मानले जातात. *ABC Juice चे फायदे ✨* ✔️ शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. �✔️ त्वचेला नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. �✔️ हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयोगी. �✔️ पचन सुधारण्यास मदत. �✔️ शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत. �✔️ सकाळी फ्रेश आणि हलके वाटते. *ABC Juice बनवण्यासाठी लागणारे साहित्य:* 🥤 ● १ सफरचंद ● १ लहान बीट ● २ गाजरे ● थोडे आलं ● अर्धा लिंबाचा रस ● थोडे पाणी *कृती:* सर्व भाज्या आणि फळे स्वच्छ धुऊन छोटे तुकडे करा. �मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालून थोडे पाणी टाकून ब्लेंड करा. �हवे असल्यास गाळून घ्या. वरून लिंबाचा रस घाला आणि थंडगार सर्व्ह करा. 🫰✨*काही महत्त्वाच्या टिप्स 🌿* ● शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी प्या. ● साखर टाकू नका. ● ताजे बनवलेले ज्यूस लगेच पिणे उत्तम. ● आठवड्यातून ३-४ वेळा घेतले तरी फायदा होतो. सुरुवातीला मला वाटले हा ज्यूस कदाचित बीटमुळे थोडा वेगळा लागेल… पण सफरचंदामुळे चव खूप छान balanced लागते. आपणही एकदा नक्की ट्राय करा आणि दिवसाची सुरुवात हेल्दी पद्धतीने करा.
Comments (4)

Srikumar महाराज🇮🇳☸️
Jun 19, 2026
radhe radhe blessed you 🙏

सविता
Jun 19, 2026
Radhe radhe 🙏🌹

Srikumar महाराज🇮🇳☸️
Jun 19, 2026
राधे राधे श्याम🙏 धन्यवाद

प्रेम कुमार
Jun 19, 2026
🌹 जय श्री कृष्णा राधे राधे 🌹 शुभ प्रभात वंदन 🌹
