MyMandirInstall

*वयाच्या ४०–४५ नंतर फिटनेसची सुरुवात* ४०–४५ च्या वयात एक गोष्ट हमखास होते — आरशात पाहिलं की अचानक फिटनेसची आठवण येते. "उद्या पासून चालायला सुरुवात करते." "सोमवारपासून जिम." "माझ्या मेत्रीणीने १ महिन्यात १० किलो कमी केलं!" 'आज काल मॅरॅथॅान धावून सोशल मेडियावर फोटो पोस्ट केला की काय कचर्याने लाईक्स मिळतात' लगेच ॲानलाईन जीमचा ड्रेस, योगा मॅट, वॅाटर बॅाटल, जीमची वर्षभराची मेंबरशीप घेतली जाते. *पहिला नियम: अचानक काहीही सुरू करू नका* ४० नंतर खालील गोष्टी अनेकदा आपल्या नकळत सुरू झालेल्या असतात: - रक्तदाब (high blood pressure) - साखर(diabetes type 2) - hypertriglyceridemia, high cholesterol - गुडघे, पाठ, मान दुखी - हृदयाची क्षमता कमी होणं *पायरी १: शरीराचे बेसिक पॅरामीटर्स तपासा* शरीराचा बायोडेटा तपासायच्या गोष्टी: - वजन - उंची - BMI (बॉडी मास इंडेक्स) - कंबरेच्या घेराचं माप - शरीरात किती चरबी आहे - स्नायू किती आहेत - पोटातली (व्हिसरल) चरबी - BMR (शरीर किती कॅलरी जाळतं) - शरीरातलं पाणी *पायरी २: व्हायटल्स (आरोग्याची मोजमापे) तपासणं* ओळखीच्या आणि चांगल्या डॅाक्टरकडे तपासा: - रक्तदाब - आरामात बसल्यावर नाडी - ऑक्सिजन लेव्हल - श्वासोच्छवासाचा रेट - साखर (गरज असल्यास) *पायरी ३: रक्ततपासण्या* 1. साखर तपासणी - फास्टिंग शुगर - जेवणानंतरची शुगर - HbA1c 2. कोलेस्ट्रॉल - Total Cholesterol - LDL (वाईट) - HDL (चांगलं) - Triglycerides 3. थायरॉईड - TSH - T3 - T4 4. लिव्हर टेस्ट - SGOT - SGPT - फॅटी लिव्हर आहे का? 5. किडनी टेस्ट - ब्लड युरिया - सिरम क्रिएटिनिन - युरिक अ‍ॅसिड 6. CBC - हिमोग्लोबिन, wBC, MCV, platelets - अ‍ॅनिमिया आहे का? 7. व्हिटॅमिन्स - Vitamin D - Vitamin B12 - Calcium *पायरी ४: ECG आणि 2D Echo* - ECG ४० नंतर सगळ्यांनी ECG करायला हवा. - 2D Echo कधी? - ECG मध्ये काही गडबड - BP / साखर जुनी - धाप लागते - छातीत कळ *पायरी ५: जिम* - जिम म्हणजे सुरुवात नाही — ते फायनल स्टेप आहे. - जिम कधी? - रिपोर्ट ठीक - शरीर थोडं तयार - मार्गदर्शन घ्याची तयारी *निष्कर्ष* फिटनेस म्हणजे रेस नाही, प्रवास आहे. ४०–४५ नंतर फिटनेस म्हणजे: - आयुष्य लांबवणं - वेदनांशिवाय चालणं - औषधं कमी करणं - स्वतःला टिकवून ठेवणं अचानक सुरुवात केली तर फिटनेस टिकत नाही. समजून सुरुवात केली तर फिटनेस आयुष्यभर साथ देतो. म्हणून — आधी तपासणी मग तयारी आणि शेवटी व्यायाम.

Post media

Comments (4)

Srikumar  महाराज🇮🇳☸️

Srikumar महाराज🇮🇳☸️

Jan 16, 2026

शुक्रवार की सुबह की शुभकामनाएँ, आपका दिन शुभ हो, धन्यवाद। बच्चा

Srikumar  महाराज🇮🇳☸️

Srikumar महाराज🇮🇳☸️

Jan 16, 2026

Jai Mataji 🙏 swasth raho kush raho

Rama Devi Sahu

Rama Devi Sahu

Jan 16, 2026

🌹🌹 Shubha Shukravar ki Subha Kamanayen ke Sath Subha Dopahar Jii 🌹 Mata Rani ki Aasirbad Aap or Aap ke Pure Parivar pr Hamesha Banaye Rakhe 🌹 Aap ka Din Subha Mangalmay 🌹🌹

Rama Devi Sahu

Rama Devi Sahu

Jan 16, 2026

🙏🌺 Jai Mata Di 🌺🙏