MyMandirInstall

🌹 भावपूर्ण आदरांजली 🌹 जम्मू–कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भद्रवाह–चंबा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात देशसेवेवर असताना भारतीय सेनेचे १० शूर जवान वीरगतीस प्राप्त झाले, ही बातमी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानांना श्रद्धांजली या अपघातात जखमी झालेल्या जवानांच्या लवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी आम्ही मनापासून प्रार्थना करतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. देशासाठी बलिदान देणारे हे जवान कधीही विसरले जाणार नाहीत. त्यांचे शौर्य, त्याग आणि समर्पण सदैव देशवासीयांच्या हृदयात अजरामर राहील. 🇮🇳 वीर जवान अमर रहें… जय हिंद! 🇮🇳

Post media

Comments (0)

No comments yet. Be the first to comment!