MyMandirInstall

🌱 *"पचन व्यवस्थित होण्यासाठी"* *"काही घरगुती उपाय"* मित्रांनो, अनेकदा आपल्या घरातील ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावतो... अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया... आतड्यांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि पचनसंस्थेला गती देण्यासाठी आहारातील फायबरचे प्रमाण वाढवावे. यासाठी आहारात भिजवलेले बदाम, कोशिंबीर, पुदिना, काकडी आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवू शकता... रोज जेवणात साजूक तुपाचा वापर करावाच आणि ज्यांना नेहमीच त्रास होत असेल त्यांनी रात्री झोपताना एक चमचा तूप आणि त्यावर कोमट पाणी प्यावे. तसेच चेरी, द्राक्ष, बदाम, काळे मनुके अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा... त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते... दररोज दुपारी एक वाटी ताजे दही घ्यावे... दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात... ते पचनव्यवस्था सुधारतात... तसेच आलं, काळे मिरे, सैंधव मीठ आणि धणे या मसाल्यांचा जेवणात समावेश असायला हवा... हे मसाले फक्त जेवणाचा स्वादच वाढवत नाहीत तर पचनकार्य ही सुधारतात... व्हिटॅमिन-सी असलेले ब्रोकोली, किवी फळ, स्ट्रॉबेरी ही लिंबू वर्गीय फळे खावीत... रंगीत फळं, भाज्या भरपूर खाव्यात. त्याने पोट साफ होते आणि अपचनाचा त्रास होत नाही... सकाळी उठल्यावर व्यायाम आणि पोटाला मालीश केल्यास पचनशक्ती वाढते... काही चांगल्या तेलांनी पोटाची मालीश करावी... सकाळी गरम पाणी प्यायला आवडत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा, त्याने पोटातले ऑसिड कमी होऊन पोट साफ राहील... भूकेपेक्षा थोडे कमी खावे, त्यामुळे पचन व्यवस्थितपणे व्हायला मदतच होईल... काकडी, गाजर, मुळा, टोमॅटो, बीट, पातीचा कांदा, सीझन असतो तेव्हा मुळ्याच्या कोवळ्या शेंगा... असे सलाड नियमित खावे... ज्यांना चावणे शक्य नसेल त्यांनी कोशिंबीर स्वरूपात खाणे गरजेचे आहे. ज्यांचा कोठा जड आहे त्यांनी रोजच्या भाकरी अथवा चपाती मध्ये पीठ/कणिक मळताना एक चमचा एरंडेल तेल घातल्यास पोट साफ होण्यास मदत होते... तुम्ही कोणत्या प्रकारे खाता, कशा प्रकारे खाता यावरही पचनकार्य अवलंबून असते... तेव्हा जेवायला मांडी घालून म्हणजे सुखासनात बसावे.... प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे. प्रत्येक घासाचा ज्युस बनून पोटात गेला पाहिजे... शांतपणे, समाधानाने, जेवणाचा आनंद घेत जेवले पाहिजे... त्यासाठी एखादा श्लोक म्हणून घरातील सर्व सदस्य एकत्र मिळून जेवायला बसायला हवे... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवताना टीव्ही, मोबाईल पाहू नये... अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला तर अन्नपचन व्यवस्थित होऊन मलावरोध अथवा अपचनाचा त्रास होणार नाही. संकलित... _नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुपमध्ये सतत अपडेट राहा.._ ----------------------------- डॉ रासकर. *(कॉपी पेस्ट)*

Comments (0)

No comments yet. Be the first to comment!