
Srikumar महाराज🇮🇳☸️
235 days ago
#health tips *🪷लिंबूचे आयुर्वेदिक फायदे🪷* ▪️ *लिंबू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत आहे* लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन सी हे आपल्या शरिरासाठी 🧍🏻♂️प्राथमिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते जे मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करते. व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकार, पक्षाघात आणि कमी रक्तदाबाचा 🩸 धोकाही कमी होतो. सरासरी आकाराच्या लिंबाच्या रसामध्ये 31mg पर्यंत व्हिटॅमिन सी असते, तर प्रौढ व्यक्तीला 👵🏻दररोज 65 ते 90mg व्हिटॅमिन सी आवश्यक असते. ▪️ *वजन घटवण्यात मदत करतो* काही अभ्यासांनुसार, लिंबूमध्ये असलेले पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंटमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म आहेत. लिंबूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तातील🩸 ग्लुकोजची पातळी कमी करून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारू शकतात. या दोन्ही गोष्टी टाईप 2 मधुमेहाचे मुख्य कारण मानल्या जातात. ▪️ *त्वचा सुधारते* लिंबूमध्ये 🍋 असलेले व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. तसेच, त्वचेचा एजिंगपासून (वृद्धत्वापासून) बचाव करते आणि उन्हामुळे ☀️ होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. ▪️ *पचनक्षमता मजबूत होण्यास मदत होते.* अनेक जण बद्धकोष्ठतेपासून 💩 आराम मिळावा यासाठी सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करतात. कोमट पाण्यात लिंबू 🍋 मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. आयुर्वेदिक औषधांमध्ये लिंबू पाण्याने पचनक्रिया सुधारते असे सांगिण्यात आले आहे. ▪️ *नैसर्गिक ब्रेथ फ्रेशनर* अनेक वेळा लसूण 🧄, कांदा किंवा मासे खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते. लिंबू पाणी 🚰 प्यायल्याने श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. लिंबू लाळ उत्तेजित करते असे मानले जाते. ▪️ *मुतखड्याच्या आजारामध्ये लिंबू मदत करते* - लिंबामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड मुतखड्याचा धोका कमी करू शकते. खरं तर, *सायट्रिक अॅसिडमध्ये सायट्रेट नावाचे संयुग असते, जे लहान-लहान मुतखड्याचे स्टोन्स फोडण्यास मदत करते.* ▪️ *अॅनिमियापासून लिंबू बचाव करते* लोहाच्या 🛡️कमतरतेमुळे होणारा अशक्तपणा म्हणजेच अॅनिमिया हा एक अतिशय सामान्य आजार 🤒आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अन्नामध्ये पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा त्याला याचा त्रास होतो. लिंबूमध्ये काही प्रमाणात लोह असते. ▪️ *हृदयाला ठेवते हेल्दी* जर आपण एक लिंबू संपूर्ण खाल्ले 🤌🏻 तर आपल्या शरिराला 51% (RDA) व्हिटॅमिन सी मिळू शकते. लिंबूपाणी प्यायल्याने व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. काही संशोधनात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन सीमुळे हृदयविकार 🫀आणि स्ट्रोक्सचा धोका कमी होतो. तसेच, जर तुम्ही लिंबू खाल्ले तर त्यामध्ये असलेले *फायबर आणि प्लांट कंपाऊंड देखील हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.* ( *संकलन:* आर्या देव)

Comments (0)
No comments yet. Be the first to comment!
