सर जॉन वुड्रॉफ ब्रिटिश साम्राज्याच्या कलकत्ता हायकोर्टाचे ते मुख्य न्यायाधीश होते. तंत्राशी संबंधित अशी एक केस त्यांच्यासमोर होती. एक ख्रिश्चन धर्मगुरू होता. तो आदिवासींना म्हणायचा, "ख्रिश्चन व्हा" त्यांना सांगायचा, आमचा एकच देव आहे. एकच यशु. हिंदूत किती देव! लाकूड, दगड , गोटे, सगळ्यांचे देव. हा कसला धर्म? तुम्ही ख्रिश्चन झालात तर आमचा येशू तुमचा उद्धार करील. रामसिंग आदिवासी संतापतो, "आमच्या देवाची शक्ती अजमावयाची आहे का?" त्याने एक विंचवाची आकृती काढली. सभोवती अधोमुखी त्रिकोण काढला. चतुष्कोणात तो त्रिकोण सामावून टाकला. तो म्हणला, "आमच्या देवाची शक्ती पाहायची आहे? या आकृतीला स्पर्श कर." तो धर्मगुरू खदखदून हसला. त्याने त्या आकृतीला स्पर्श केला. विषारी विंचू चावल्यामुळे तो मोठ्याने बोंबलू लागला. आणि वेगाने तिथून दवाखान्यात गेला. रामसिंग हसत होता. 'आता नाही, हा आमच्या देवाची निंदा करणारा." त्या मिशनऱ्याने कोर्टात प्रकरण नेले. जस्टीस वुड्रॉफच्या कानावर हे प्रकरण येताच त्यांनी स्वतः ती केस चालवायला घेतली. त्या आदिवासीच्या खेड्यावर तो मुद्दाम गेला. घरट्या घरट्यावर त्रिकोण चौकोन होते. उभ्या-आडव्या रेषा होत्या. काही अधोमुख त्रिकोण तर काही ऊर्ध्वमुख! जी माहिती हवी होती त्याकरता त्यांनी तंत्रावरची पुस्तके धुंडाळलीत वाचून काढलीत. तंत्रावर असलेली उत्कृष्ट पुस्तके अनुवादाला घेतली. त्याकरता बंगालच्या श्रेष्ठ अशा संस्कृत पंडित शास्र्यांची मदत घेतली. त्यांना भरपूर पैसे दिलेत आणि एकामागून एक श्रेष्ठ आणि परम सुंदर असे ग्रंथ लिहिले. तंत्राने वुड्रॉफ इतका आकर्षिला गेला होता की त्याने त्या केसनंतर न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि आपला सर्व काळ हिंदूंचे (वैदिकांचे) धर्मशास्त्र, तंत्रशास्त्र, अध्ययनात घालविला. पुढे त्याने हिंदू धर्माचे तांत्रिक दीक्षाही घेतली. हिंदूधर्मातल्या पूजन अर्चनादी विधी-विधानाला, रीती-रिवाज, परंपरांना पाश्चिमात्य 'रानटी' , म्हणायचे त्यांना त्याने सुंदर उत्तर दिले आहेत. संदर्भ- प्रतिबंध आकांक्षांचे प.पु.गुरुदेव डॉ.काटेस्वामीजी. *२९,११,२१,सोम.s.n.b.7:10 pm.plg.*

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

शुभ दिन👏👏 आजचा दिनविशेष.२९ नोव्हेंबर १९९३. प्रसिध्द उद्योगपती जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी.टाटा यांचा स्मृतिदिन. टाटांचा जन्म पॅरिस, फ्रान्स येथे झाला. फ्रान्समधे टाटा कुटुंबीयाला बहुमान असतानाही त्याचा त्याग करून जे. आर. डी. टाटांच्या वडिलांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.भारताचे नागरिकत्व स्वीकारून उद्योग आणि देशासाठी सर्वस्व अर्पण केले.जे.आर.डी.मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्समधेच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत. जे. आर. डी. टाटांनी वयाच्या २२ व्या वर्षी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांच्या २२ कंपन्या होत्या. ते निवृत्त झाले, त्या वेळी समूहाच्या ९५ कंपन्या होत्या. प्रत्येक कामात त्यांनी शिस्त आणि दर्जा जपला. जवळजवळ अर्ध शतकाच्या आपल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी भारतातील सर्वांत मोठा उद्योगसमूह असण्याचा मान टाटा उद्योग समूहाकडे बहुतांश वर्षे टिकवून ठेवला तो केवळ त्यांच्यातील असामान्य नेतृत्व- गुणांमुळेच. त्यांना कामाचं जणू व्यसनच होतं. अगदी लहानातल्या लहान गोष्टींतही त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास असे. टाटा उद्योगसमूह हा जे. आर. डी. यांच्या काळात खूप विस्तारला. विद्युतनिर्मिती व वितरण, पोलाद, ट्रक, मोटारी, रसायनं, तंत्रज्ञान, संगणक, हॉटेल्स, वातानुकूलीत यंत्र, इलेक्ट्रोनिक्स्‌, सिमेंट, चहा, औषधं, सौंदर्यप्रसाधनं, व्हेंचर कॅपिटल- अशा एक ना अनेक उद्योगधंद्यांमध्ये जे. आर. डी. यांच्या कारकीर्दीत टाटा उद्योगसमूहाने पाय रोवले. इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एअरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली.यामुळेच ते भारतीय नागरी विमान उड्डाणांचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले.पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एअर इंडिया ठेवले गेले. जे.आर. डी. यांची स्वत:ची अशी काही व्यावसायिक तत्त्वे होती की, जी ते स्वत: पाळत व त्यांच्या सहकार्‍यांकडून ती पाळली जावीत अशी त्यांची अपेक्षा असे. त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे प्रमुख म्हणून बावन्न वर्षे पद भूषवले. अनेक अडचणींना, व्यावसायिक अडथळ्यांना तोंड देत असताना सुद्धा आपल्या उच्च व्यावसायिक मूल्यांना त्यांनी कधीही मुरड घातली नाही. अत्यंत सचोटीचा व्यवहार, प्रामाणिकपणा आणि आपल्या कामांसाठी कुणाला लाच द्यायची नाही या त्यांच्या तत्त्वांसाठी ते सर्वज्ञात होते. व्यावसायिक उच्च मूल्यांची अवहेलना न करताही उत्तम, फायदेशीर व मोठ्या प्रमाणावर व्यवसाय-उद्योगधंदा करता येतो हे जे. आर. डी. यांनी स्वत:च्या कृतीने भारताला तसेच सर्व जगाला दाखवून दिले.पूर्ण जगतात टाटा उद्योगसमूह व जे. आर. डी. यांचं नाव दुमसुमलं आहे. टाटा म्हणजे दर्जा, टाटा म्हणजे उत्कृष्टता अशी समीकरणं जगात रूढ करण्यामागे जे. आर. डी. यांचा सिंहाचा वाटा आहे. उद्योगधंद्यांच्या व्याप्तीबरोबर समाजसेवा, समाजकारण, सांस्कृतिक सहभाग, कला अशा समाजाच्या अनेक क्षेत्रांच्या संदर्भात सुद्धा जे. आर. डी. यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांना सामाजिक जाणीव व आस्थाही खूप होती. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि . १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१साली मुंबईत सुरू केले.समाजसेवेचं व समाजकारणाचं त्यांचं दायित्व या अशा समाजाभिमूख व समाजहिताच्या दृष्टीने निर्माण केलेल्या संस्थांमधून यशस्वीरीत्या निभावले. म्हणूनच आजही उद्योगपतींच्या नामावलीमध्ये जे. आर. डी. यांचं स्थान अग्रभागी घेतलं जातं. उद्योगात यश मिळविताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना जे.आर.डींनी राबविल्या. त्यांची कामगारविषयक तत्त्वे अतिशय उदार, सौदार्हपूर्ण व त्या काळाचा विचार करता अतिशय पुरोगामी होती.त्यांच्याच पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग व्यवसायांसाठी कायदेशीररित्या बंधनकारक केल्या. टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाले. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. हवाई क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित असलेला अमेरिकेतील ‘टोनी जानूस’ हा पुरस्कार मिळवणारे जे. आर. डी. हे पहिले भारतीय आहेत. भारतीय उद्योगधंद्यांना आणि भारतीयांना पंख देणार्‍या आणि सामाजिक बांधिलकी कायम जपणाऱ्या जे.आर.डी. टाटा या असामान्य उद्योगसम्राटाला त्रिवार प्रणाम!!! ©® सौ.संध्या यादवाडकर....

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आजचा दिनविशेष.२९ नोव्हेंबर १८६९.महान सेवाव्रती अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म गुजरातच्या भावनगरमधील एका सधन कुटुंबात झाला. त्यांनी माध्यमिक शाळेची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. इ.स.१८९१मध्ये इंजीनिअरिंग पास करून ते बीजीजेपी.रेल्वेत अभियंता झाले. त्यांचे वडिल विठ्ठलदास हे नावाप्रमाणेच आध्यात्मिक विचाराचे व सेवाव्रती होते. अमृतलालजींच्या पत्नीचे अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनास प्रारंभ झाला. ते सन १८९५ ते १९०० पर्यंत पोरबंदरला होते. तेव्हा भीषण दुष्काळ पडला होता. मरणासन्न अवस्थेतील मजूर पती-पत्नीने आपल्या तीन पोटच्या गोळ्यांना मातीत जिवंत गाडले. हे हृदयद्रावक दृश्य बघून त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी त्या बालकांना स्वतःच्या हाताने बाहेर काढले आणि मानव सेवेचा संकल्प केला. ठक्कर बाप्पांनी तेथील दुष्काळपिडीतांसाठी वर्गणीच जमवली नाही तर एक खाणावळही उघडली. ज्यात दररोज सहाशे-सातशे लोक जेवण करत असत. बाप्पा रोज पहाटे उठून पूजा-अर्चा आटोपून खाणावळीत पोहोचत. ते सर्वांत शेवटी जेवत. गावोंगावी जाऊन कांबळे-घोंगडे व वस्त्रप्रावरणे वाटत. शंकरपुरा गावातील लोकांची अन्नान्न दशा त्यांना पाहावली नाही. एक स्त्री झोपडीबाहेर पडत नव्हती, कारण अंगावर एकही धड वस्त्र नव्हते. या भुकेकंगाल स्त्रीला बघून बाप्पाचे हृदय पिळवटून निघाले व ढसाढसा रडले. त्यांनी ‘भिल्ल सेवा संघटना’ स्थापन केली. त्यामार्फत आदिवासींसाठी शाळा व आश्रम चालविले. इ.स.१९३२मध्ये ते झालोदच्या सीमेवरील बारिया या आदिवासी वस्तीस ११ कोस पायी चालत गेले. कारण तेथील लोक आपली सारी जमापुंजी दारू पिण्यात उडवित होते. तेथे त्यांनी कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना घेऊन दारू तथा समाजातील कुप्रथांचा विरोध केला. चौका-चौकांत तक्त्यांवर “शराब मत पियो। शराब पिने से बरबादी आयेगी। रोज नहाओ। रोज नहाने से शरीर साफ रहेगा। दाद, खुजली और नहरू नहीं निकलेंगे। जादू-टोना करने वाले ओझाओं से मत डरो। वे लुटेरे हैं, तुम्हें ठग लेंगे।” असे लिहिले होते. या घोषणा वाचत जाणाऱ्या राजाने ठक्कर बाप्पांना धमकावले. त्यांना रातोरात राज्य सोडून जाण्याचा हुकूम फर्मावला. संघटनेचे कार्य करता करता बाप्पा प्रत्येक बाल-आश्रमाच्या पुढ्यात जमलेली घाण व खरकटे स्वतः स्वच्छ करत असत. हे बघून इतरही त्यांचे अनुकरण करत. इ.स.१९४३-४४ च्या दुष्काळात कित्येक गावी प्रेते जाळण्यास माणसे उरली नव्हती. अशा जागीही जाऊन त्यांनी भोजन, कपडेलत्ते आणि औषधे पुरवली. रात्री जागून ते कार्य करत. नौखालीत इंग्रजांनी अस्पृश्यांची घरे जाळली. तेथे जाऊन त्यांनी दीन-दुःखीतांना मदत केली. म.गांधीजींसोबत ते ‘हरिजन सेवक संघ’मध्ये सेवाकार्यात जुळून होते. एकदा तर त्यांनी धुण्याचा गठ्ठा डोक्यावर घेऊन बाजार ओलांडत धोब्याचे घर गाठले होते. सेवेत कसल्याही प्रकारचे संकोच वा लाज बाळगता कामा नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. बालपणापासून बाप्पा प्रामाणिक होते. लोकांची काम करताना लोक आपली जमीन वाचविण्यासाठी नोटांनी भरलेली पिशवी दाखवून भ्रष्ट करू पाहत. परंतु ते भ्रष्टाचारास पाप समजत. जेव्हा ते लोकनिर्माण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते तेव्हा तेथेही त्यांच्यावर पैसे घेण्यास दबाव टाकला गेला. तेथीलही नोकरी सोडणे त्यांनी उचित समजले होते. ठक्कर बाप्पा हे त्याग, सेवा, बलिदान आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत रुप होते. त्यांचे संपूर्ण जीवन मानवतेच्या सेवेकरीता समर्पित झाले होते. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळेच ते महान संतांच्या श्रेणीत मोडतात. त्यांनी खरोखरच मानव कल्याणासाठी आयुष्य वेचले. वयाच्या ८१ व्या वर्षांपर्यंत ते अथकपणे कार्य करतच होते. याच त्यांच्या पुण्यप्रतापी कार्याची दखल घेऊन ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार’ योजना अंमलात आणली. विश्वात सर्वात मोठी सेवा कोणती? असे कोणी विचाराल तर ती आहे मानव सेवा !आदर्श सेवेची साक्षात मूर्ती असलेल्या ठक्कर बाप्पांना शतशः प्रणाम!!!! माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर