+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

आदिशक्ती माहूरगडवासिनी रेणुका यादवराजा देवगिरी यांची कुलस्वामिनी माता रेणुका: महाराष्ट्राचे जागृत शक्तिपीठ 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ म्हणजे माहूरची रेणुका होय. माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी. आख्यायिका आहे की, दत्तात्रयांचा जन्मदेखील याच माहूर गडावर झाला. गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी ८०० ते ९०० वर्षांपूर्वी पूर्वी बांधलेले असावे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले असून गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याचे आहे. देवीचा मुखवटा पूर्वाभिमुख असून तब्बल 5 फुटी उंच आणि रुंदी 4 फुटी इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे. अशी आहे आख्यायिका माता रेणुकाच्या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली ते दु:खी झाले. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुझ्या दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस; परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला ‘मातापूर ‘ म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील ‘ऊर’ गाव असल्यामुळे ‘माऊर’ आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. दक्षिणाभिमुख प्रवेशद्वार सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्ती आहेत. परशुरामाचे देऊळ, दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णू कवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृ तीर्थ आणि राम तीर्थ इत्यादी तीर्थ आहेत

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 9 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

अनुपान >वैद्यक>मानवी वैद्यक>आयुर्वेद>अनुपान अनुपान : (आयुर्वेद). आहार सामान्यतः घन असतो तो घेतल्यावर पातळ द्रव्य पिण्याची आवश्यकता असते त्याला ‘अनुपान’ म्हणतात. पाणी सर्वांत श्रेष्ठ अनुपान आहे. गुण :  ते रुची, तृप्ती, पुष्टी करते अन्न ओले करते पचनमार्गात पचनाकरिता खाली खाली नेते व पचनक्रियेस मदत करते अन्नाचे रुपांतर शरीरघटकांत करून शरीरात लवकर पसरविते शरीराची झीज भरून काढते आयुष्य, बल, उत्साह निर्माण करते. काल : ते जेवणाचे आरंभी प्याल्याने कृशता, नंतर प्याल्याने स्थौल्य व मध्ये प्याल्याने सम शरीर करते. वातविकारी व्यक्तीने किंवा वातप्रकृती व्यक्तीने ते स्निग्धोष्ण, कफात्मक व्यक्तीने रुक्षोष्ण आणि पित्तदुष्ट व्यक्तीने गोड व थंड प्यावे. वर्ज्य—गवई, वक्ते, अध्यापक यांनी, तसेच उरःक्षत, खोकला, श्वास, उचकी, स्वरभेद, तोंडाला पाणी सुटणे व मानेच्या वरचे रोग झालेल्यांनी जेवनानंतर लगेच पाणी पिऊ नये. आहार-द्रव्यांना अनुसरून अनुपाने भिन्न असतात. उदा., पिष्ठान्न, मध, दही, खीर, मद्य, विष यांवर थंड पाणी उपयुक्त स्नेहांवर गरम पाणी वाल, मूग यांवर दूध, मांसरस उपयोगी. अनुपानाचा दुसरा अर्थ औषधाबरोबर घेणे म्हणजेच सहपान. सूतशेखर मोरावळ्यात किंवा दुधात घेणे मध, तूप, किंवा इतर योग्य अनुपानाबरोबर पारदभस्म घेणे यांत मोरावळा, दूध, मध, तूप ही सहपाने असूनही त्यांना अनुपान हाच शब्द रूढ झाला आहे. भस्मे, मात्रा इ. औषधे पार्थिव किंवा पार्थिव-द्रव्य-घटित असतात मानवी शरीराला ती वनस्पति-द्रव्यांपेक्षाही समानतेच्या दृष्टीने दूरची असतात प्राणिज, वनस्पतिज व पार्थिव द्रव्यांत पार्थिव सर्वांत दूरचे व प्राणिज सर्वांत जवळचे द्रव्य आहे. यामुळे शरीरात क्रमाने ह्यांचे स्वागत उशिरा वा लवकर होते. उशिरा, जितका काळ होतो तितका काळ, ते द्रव्य आमाशयावर प्रतिकूल कार्य करते म्हणून द्रव्याबरोबर अनुपान गेल्याचे ताबडतोब स्वागत होते व पचनालाही सुरूवात होते. म्हणून दूध, मध, तूप अशी शरीराला नित्य परिचित, सवयीची अशी द्रव्ये बहुधा अनुपानार्थ वापरावीत. अनुपाने दोष, रोग इत्यादींना अनुसरून वापरावीत. जोशी, वेणीमाधवशास्त्री

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

आपल्या स्वयंपाकघरात बऱ्याच अश्या गोष्टी असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या गोष्टींचा वापर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. आज आम्ही आपल्याला अश्याच एका गोष्टी बद्दल सांगणार आहोत जी आरोग्यासाठी फायदेशीर असते. बऱ्याचदा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गोष्टींचे फायदे माहीत नसतात. आज या लेखाच्या माध्यमातून आपण त्या गोष्टीची माहिती करून घ्या जी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या गोष्टीचा दररोज वापर केल्याने बरेच आजार टाळता येऊ शकतात. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमाने या गोष्टीचे सेवन करावं. मोहरीचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर मोहरीचे तेल जवळजवळ प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. मोहरीचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. वेदना कमी करण्यात मदत होते - मोहरीच्या तेलाचे सेवन केल्याने वेदनेपासून आराम मिळतो. शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी मोहरीच्या तेलाचा आपल्या आहारात समावेश करावा. सांधेदुखीत फायदेशीर - मोहरीचे तेल वापरल्याने सांधेदुखीच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यासाठी दररोज मोहरीच्या तेलाने मालिश करावी. नियमाने असे केल्यास सांधे दुखण्यापासून आराम मिळतो. भूक वाढविण्यात मदत होते - बऱ्याच लोकांना भूक न लागण्याची समस्या असते. भूक न लागण्याच्या त्रासामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागतो. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी आपल्या आहारात मोहरीच्या तेलाला समाविष्ट करावं. मोहरीच्या तेलाचा वापर केल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर - मोहरीचं तेल दम्याचा रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं. मोहरीच्या तेलात मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आढळतं जे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं. वजन कमी करण्यात उपयुक्त - मोहरीचं तेल वजन कमी करण्यासाठी वापरण्यात येत. मोहरीच्या तेलात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळतात जे मेटाबालिज्म (चयापचय) वाढविण्यास मदत करतात. वजन कमी करणाऱ्यांना आपल्या आहारात मोहरीच्या तेलाला समाविष्ट करावं. दात दुखीचा त्रास दूर होतो - मोहरीच्या तेलाचे वापर केल्याने दात दुखण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. त्यासाठी मोहरीच्या तेलात मीठ मिसळून हिरड्यांवर चोळावे. या मिश्रणाची मालिश केल्याने दातदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते. प्रतिकारक शक्ती बळकट होते - मोहरीचं तेल आरोग्यासाठी फायदेशीर असतं. नियमाने मोहरीचे तेल वापरल्याने प्रतिकारक शक्ती बळकट होते. दररोज मोहरीच्या तेलाचं सेवन करावं. त्वचेला चकाकी येते - मोहरीचं तेल त्वचेसाठी देखील फायदेशीर असतं. त्वचेवर मोहरीचं तेल लावल्याने त्वचेची आद्रता कायम राहते आणि त्वचा तजेल होते. आपण मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश देखील करू शकता

0 कॉमेंट्स • 1 शेयर