विजयादशमी ची पौराणिक कथा दुर्गासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रैलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. दुर्गासुराने इंद्राविरुध्द युध्द पुकारले. शुक्राचार्य दुर्गासुराचा गुरु होता. तो संजीवनी विद्येच्या जोरावर मेलेल्या राक्षसांना पुन्हा जिवंत करी. दुर्गासुराने बृहस्पतीला कैद करुन पाताळात स्थानबध्द करुन ठेवले. इंद्राचा दुर्गासुराने पराभव केला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. दुर्गासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करुन शस्त्रास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी, मोहमाया, चामुंडा इत्यादी ५६ कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा, दुर्धर, दुर्मुख, बिडाल यांच्यासारख्या अतिबलाढय राक्षसांना विजया देवीने ठार मारले. त्यामुळे तालजंघ राक्षस संतापला आणि त्याने विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करुन तिने दुर्गासुराचा वध केला आणि विजय मिळवला. नऊ दिवस हे युध्द चालले होते. दहाव्या दिवशी विजय मिळाल्याने विजया देवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्वाचा दिवस आहे. शमीपूजन, अश्मंतक (आपटयाच्या) वृक्षाचे पूजन विजयादशमीला करण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा एक पुत्र होता. त्याने आपल्या पुत्राला भडोच शहरी वरतंतू या ऋषीकडे विद्यार्जन करण्यासाठी पाठविले. ऋषीकडे राहून कौत्स विद्यार्जन करु लागला. विद्यार्जन पूर्ण होताच आपल्या गुरुने आपल्याकडून गुरुदक्षिणा घ्यावी अशी कौत्साची फार इच्छा होती. कौत्साने फारच आग्रह केल्यामुळे वरतंतू ऋषी त्याला म्हणाले, 'तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी सुवर्णमुद्रा व त्यादेखील एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात मला आणून दे!' एकाच व्यक्तीकडून तीन दिवसात एवढे द्रव्य मिळविणे फारच कठीण होते. त्या काळी रघुराजा हा अयोध्येचा राजा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा होता. कौत्स अयोध्येला रघुराजाकडे गेला. रघुराजाजवळ एवढे द्रव्य नव्हते. एवढया सुवर्णमुद्रा तीन दिवसात देण्याचे रघुराजाने कौत्साला आश्वासन दिले आणि त्याने इंद्राबरोबर लढाई करण्याची तयारी केली. इंद्राला ही गोष्ट समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर शमीच्या आणि आपटयाच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून वरतंतू या त्याच्या गुरुला अर्पण करण्यास दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रांचा शमीच्या आणि आपटयाच्या वृक्षांखाली ढीग करुन लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले. लोकांनी सीमेबाहेर असलेल्या त्या वृक्षांची पूजा केली. यथेच्छ सोने लुटले आणि एकमेकांना देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून शमीची व अश्मंतक (आपटयाच्या) वृक्षांची पूजा करुन सुवर्णमुद्रा म्हणून आपटयाची पाने लुटण्याची चाल प्रचारात आली. कथा वाचून झाल्यावर म्हणावे - महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नम: । रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनी नम: शुम्भनिशुम्भस्य धूम्राक्षस्य मर्दिनी नम: । सर्वशत्रुविनाशिनी सर्वसौभाग्यदायिनी नम: । देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्‍ । रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि । उदयोऽस्तु ! जय जगदंब ॥

+6 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 18 शेयर

*प्रत्येक वर्षी दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 515 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 515 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.45 म्हणजे 21 दिवस* मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 2,589 व वेळ 515 पाहून मला धक्काच बसला !!!!* गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे . तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा . आणि वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे.* *गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत* *जन्म झाल्याचा...!* *।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।*

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 9 शेयर

हनुमानजीच्या लग्नाबद्दल माहिती आहे का? तेलंगणाच्या मंदिरात पत्नीसोबत विराजमान आहेत Lord Hanuman: भगवान हनुमान हनुमान जी आपल्या भक्तांवर येणारे सर्व प्रकारचे दु:ख आणि त्रास दूर करतात. असे मानले जाते की भगवान हनुमान खूप लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. त्यांच्या उपासनेत फार काही करण्याची गरज नाही. मंगळवारी पूजेनंतर अमृतवाणी आणि श्री हनुमान चालीसाचा पाठ केल्याने बजरंगबली आनंदी होते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते. हे सर्वांना माहित आहे की हनुमान जी एक बाल ब्रह्मचारी आहेत आणि त्यांचे लग्न झाले नव्हते, परंतु तुम्हाला माहित आहे का की पराशर संहिता मध्ये सापडलेल्या कथेनुसार हनुमान जी विवाहित होते परंतु तरीही ते नेहमी ब्रह्मचारी राहिले. वास्तविक, हनुमानजींनी हे लग्न विशेष परिस्थितीमुळे केले होते. तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात हनुमान जीचे एक मंदिर आहे, जेथे हनुमान जी पत्नी सुवर्चाला गृहस्थ म्हणून विराजमान आहेत. असे मानले जाते की येथे भेट दिल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात. हनुमान जीच्या लग्नाची गोष्ट जाणून घ्या. पराशर ऋषींनी सांगितलेल्या कथेनुसार, हनुमान जीने सूर्य देवाला आपले गुरु बनवले होते आणि त्यांनी सूर्य देवतेकडून 9 विद्या घेण्याचा निर्णय घेतला होता. सूर्यदेवाने 9 प्रमुख विद्यांपैकी 5 विद्या हनुमानजींना शिकवल्या, परंतु उर्वरित 4 विद्या शिकवताना अडथळा निर्माण झाला. हनुमानजींनी लग्न केले नाही आणि त्या विद्या शिकण्यासाठी लग्न होणे आवश्यक होते. त्यानंतर हनुमानजींचे गुरु सूर्यदेव यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास सांगितले होते. हनुमानजींनी त्यांच्या गुरुच्या आदेशानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या मुलीचे लग्न हनुमान जी बरोबर करावे, ही समस्या आता समोर आली.तेव्हा सूर्य देवाने हनुमानाचा विवाह स्वतःची सर्वोच्च तेजस्वी मुलगी सुवर्चलाशी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर हनुमान जी आणि सुवर्चला यांचे लग्न पूर्ण झाले. सुवर्चला एक तपस्वी होती. विवाहानंतर, सुवर्चला कायम तपश्चर्येत लीन झाली, तर हनुमानजींनीही त्यांच्या इतर चार विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे लग्न झाल्यानंतरही हनुमान जीचे ब्रह्मचर्य व्रत खंडित झाले नाही. आजही तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात हनुमान जीचे मंदिर आहे, जेथे हनुमान जी पत्नी सुवर्चाला गृहस्थ म्हणून बसलेले आहेत. असे मानले जाते की येथे भेट दिल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी होते.

+9 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 5 शेयर

नवरात्रीत अखंड दीप लावण्याची योग्य पद्धत दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणते ही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते. त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो. हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे. म्हणून सर्वांचे कल्याण होवो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावं. हिंदू धर्मात कोणते ही शुभ काम करताना दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात. वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत. दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी. या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते. वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो. नवरात्रात अखंड दिवा का तेवतात - आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोकं घट-स्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे नाही. जर का हा दिवा विझला तर हे वाईट मानले आहे. नवरात्रात अखंड दिवा - नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकता. नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं. अखंड दिवा लावण्याची विधी - नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपल्याला पाळावे. जेणे करून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात. सहसा लोकं पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात. जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता. मातीच्या दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्या. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावं नंतर लावावं. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवा. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकता. अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे - ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावा पासून बनवलेली असते. सव्वा हाताचा मापाचा हा रक्षा सूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात. अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता. अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण ठेवावं. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या. ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात. म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं - ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।। किंवा दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति जनार्दन: दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नमोस्तुते दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन: दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते शुभ करोतु कल्याणामारोग्यं सुख संपदा दुष्ट बुद्धि विनाशाय च दीपज्योति: नमोस्तुते शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम - नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं, दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं, दिव्याची वात उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाचा रूपात देखील संभवतो. कोणत्याही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्यानं त्वरित यश प्राप्ती होते. * अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं. * दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. * जर अखंड वात विना कारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते. * दिव्यात पुन्हा -पुन्हा वात बदलू नये. दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते. असे केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो. * नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भराभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते. * नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य -शांती आणि पितृ शांती मिळते. * नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात. * नवरात्रात विर्द्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा. * जर आपल्याला काही वास्तू दोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. * शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो.

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

दुर्गा माता सिंहाची स्वारी का करते त्या मागची कहाणी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसे, दुर्गाची वेगवेगळी रूपे आहेत आणि त्या रूपांमध्ये वेगवेगळ्या स्वार्‍या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का सिंह देवी दुर्गाची सवारी का आहे? हिंदू धर्मात सर्व देवी -देवतांचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक देवतांना त्यांच्या वाहनाच्या चित्रासह चित्रित केले गेले आहे आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याच्याशी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. प्रत्येक स्वरूपाचे स्वतःचे महत्त्व आणि कथा आहे. देवी दुर्गा तेज, शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, त्यांची सवारी सिंह आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आई दुर्गा सिंहावर स्वार का होतात? याच्याशी संबंधित आख्यायिका जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार, माता पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तप केले. एके दिवशी भगवान शिवाने विनोदाने आई पार्वतीला काली म्हटले, ज्यामुळे आई पार्वती कैलास सोडून तपश्चर्या करायला गेली. यानंतर एक भुकेलेला सिंह आई पार्वतीच्या मागे आपले अन्न बनवण्यासाठी आला, पण तिला तपश्चर्येत पाहून तो तिथे भुकेला वाट बघत बसला. सिंह कित्येक वर्षे उपाशी आणि तहानलेला बसून आई पार्वतीला आपला आहार बनवण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्याची वाट पाहत होता. पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी माता पार्वतीला गौरवर्ण अर्थात गौरी होण्याचे वरदान दिले. यानंतर माता पार्वती गंगेत आंघोळीसाठी गेली, त्यानंतर त्यांच्या शरीरातून एक काळी मुलगी दिसली, ज्याला कौशिकी किंवा गौरवर्ण झाल्यानंतर माता गौरी म्हटले जाऊ लागले. सिंह यांना तपश्चर्याचे फळ मिळाले सिंह भुकेलेला आणि तहानलेला बसलेला पाहून आई पार्वती त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झाली आणि त्याला वरदान म्हणून आपले वाहन बनवले आणि तेव्हापासून माता पार्वतीचे वाहन सिंह बनले. दुसऱ्या कथेनुसार स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार, भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय यांनी तारुका राक्षस आणि त्याचे दोन भाऊ सिंहामुखम आणि सुरपदनम यांचा देवसुराच्या युद्धात पराभव केला. सिंहमुखाने कार्तिकेयाची माफी मागितली, ज्यामुळे त्याला सिंह बनवले गेले आणि माते दुर्गाचे वाहन बनण्याचा आशीर्वाद दिला.

+41 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 72 शेयर

सर्वपितृ अमावस्या श्राद्धामध्ये पंचबळी भोग लावल्याने पितृ प्रसन्न होतील जर आपण 16 दिवसांच्या श्राद्धात पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोज इतर कर्म करु शकला नसाल तर सर्वपितृ अमावस्येला हे कर्म करु शकता. जर हे कर्म करणे देखील शक्य नसेल तर आपल्या पंचबली कर्म नक्की केले पाहिजे याने पितृ तृप्त होतात. पंचबलि संकल्प : भोजन तयार झाल्यावर एका ताटात 5 जागी जरा-जरा अन्न वाढून हातात जल, अक्षदा, पुष्प, चन्दन घेऊन हे संकल्प करावं. अद्यामुक गोत्र अमुक (आडणाव इतर) अहममुकगोत्रस्य मम पितुः (मातुः भ्रातुः पितामहस्य वा) वार्षिक श्राद्धे (महालय श्राद्धे) कृतस्य पाकस्य शुद्ध्यर्थं पंचसूनाजनित दोष परिहारार्थं च पंचबलिदानं करिश्ये।.. आता पाणी सोडावं. अमुक याऐवजी गोत्र आणि नावाचं उच्चारण करावं. पंचबली कर्म : 1.गोबली, 2. श्वानबली, 3. काकबली‍, 4. देवादिबली आणि पाचवं पिपीलिकादिबली पंचबली विधि :- 1. गोबली : मंत्र म्हणत गायीच्या समक्ष तिच्या वाटेचं भोजन पत्रावळीवर ठेवावं. ठेवताना मंत्र म्हणावा- ॐ सौरभेय्यः सर्वहिताः पवित्राः पुण्यराशयः। प्रतिगृह्वन्तु मे ग्रासं गावस्त्रैलोक्यमातरः।। इदं गोभ्यो न मम। 2. श्वानबली : याच प्रकारे कुत्र्याच्या वाटेचं भोजन पत्रीवर ठेवून मंत्र म्हणावं :- द्वौ श्वानौ श्यामशबलौ वैवस्वतकुलोöवौ। ताभ्यामन्नं प्रयच्छामि स्यातामेताव हिंसकौ।। इदं श्वभ्यां न मम। 3. काकबली : कावळ्यासाठी स्वच्छ जमिनीवर किंवा छतवर अन्न आणि पाणी ठेवून मं‍‍त्र म्हणा- ॐ ऐन्द्रवारूणवायव्या याम्या वै नैर्ऋतास्तथा। वायसाः प्रतिगृह्वन्तु भूमौ पिण्डं मयोज्झितम्।। इदमन्नं वायसेभ्यो न मम। 4. देवादिबली : देवतांसाठी पत्रीवर अन्न आणि पाणी ठेवून मंत्र म्हणा- ॐ देवा मनुष्याः पशवो वयांसि सिद्धाः सयक्षोरगदैत्यसंघाः। प्रेताः पिशाचास्तरवः समस्ता ये चान्नमिच्छन्ति मया प्रदत्तम्।। इदमन्नं देवादिभ्यो न मम। यानंतर ते अग्नीच्या सपुर्द करावं. 5. पिपीलिकादिबली : याचप्रकारे एका पत्रीवर मुंगी, कीटक इतरांसाठी त्यांच्या बिलाजवळ अन्न ठेवा आणि मंत्र म्हणा- पिलीलिकाः कीटपतंगकाद्या बुभुक्षिताः कर्मनिबन्धबद्धाः। तेषां हि तृप्त्यर्थमिदं मयान्नं तेभ्यो विसृष्टं सुखिनो भवन्तु।। इदमन्नं पिपीलिकादिभ्यो न मम।

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 13 शेयर

नवरात्रित देवीची ओटी कशी भरावी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसचं घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसचं संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपर्‍याची वाटी ठेवावी. हळद-कुंकु, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी. अनेक लोक 5 वाण ठेवतात. ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्तवाचं आहे. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी, तंबाखू नसावा. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. यासोबत गुरुजींना शिधा द्यावा.

+9 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 38 शेयर

श्राद्ध पक्ष : तर्पण आणि पिड दान म्हणजे काय श्राद्ध पक्षाच्या दरम्यान पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान कसे करावे यासंबंधी सामान्य पद्धत येथे वाचा. तर्पण : ( Pitru tarpan pind daan ) तर्पण म्हणजे काय : तृप्त करण्याच्या क्रियेला तरपण म्हणतात. पूर्वजांना मोक्ष अर्पण करण्याच्या कृत्याला श्राद्ध म्हणतात आणि तांदूळ किंवा तीळ मिश्रित पाणी अर्पण करण्याच्या कृतीला तर्पण म्हणतात. तर्पणचे प्रकार: तर्पणचे 6 प्रकार आहेत - 1. देव-तर्पण 2. ऋषी-तर्पण 3. दिव्य-मनुष्य-तर्पण 4. दिव्य-पितृ-तर्पण 5. यम-तर्पण 6. मनुष्य-पितृ-तर्पण. तर्पण कसे करावे : ( Pitru tarpan pind daan ) 1. पितृ पक्षात नियमितपणे पवित्र नदीत स्नान केल्यानंतर काठावरच पूर्वजांची नावाने तर्पण केलं जातं. यासाठी दक्षिणेकडे तोंड करून जव, काळे तीळ आणि लाल फूल हातात घेऊन विशेष मंत्राचा जप करून पाणी अर्पण करावं लागतं. 2. सर्वप्रथम आपल्याजवळ शुद्ध पाणी, बसण्यासाठी आसन (कुशाचं), मोठी थाळी किंवा ताम्हण (तांब्याची थाळी), कच्चं दूध, गुलाबाची फुले, फुलांच्या माळा, कुशा, सुपारी, जव, काळे तीळ, जानवं इत्यादी ठेवा. आसनावर बसून तीन वेळा आचमन करा. ॐ केशवाय नम:, ॐ माधवाय नम:, ॐ गोविन्दाय नम: म्हणा. 3. आचमनानंतर आपले हात धुवा आणि स्वतःवर पाणी शिंपडा म्हणजे पवित्र व्हा. नंतर गायत्री मंत्राने शिखा बांधून घ्या, टिळक लावा आणि कुशाची पवित्रि (अंगठी बनवा) बनवा. अंगठी अनामिका बोटात घाला. आता हातात पाणी, सुपारी, नाणे, फुले घेऊन खालील संकल्प घ्या. 4. तुमच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करा आणि मग म्हणा, अथ् श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थ देवर्षिमनुष्यपितृतर्पणम करिष्ये।। 5. यानंतर, ताटात पाणी, कच्चं दूध, गुलाबाच्या पाकळ्या ठेवा, नंतर हातात तांदूळ घ्या आणि देवता आणि ऋषींचे आवाहन करा. स्वतः पूर्वेकडे तोंड करून बसा, जानवं ठेवा. कुशाचं अग्रभाग पूर्वेकडे ठेवा, देवतीर्थाने अर्थात उजव्या हाताच्या बोटांच्या अग्रभागेने तर्पण करा, याचप्रमाणे ऋषींना तर्पण करा. 6. आता उत्तरेकडे तोंड करून, जानवं (माळीसारखं) परिधान करून आणि पालथी घालून बसा. दोन्ही तळव्याच्या मधून पाणी ओतून दिव्य पुरुषाला तर्पण करा. 7. यानंतर दक्षिणेकडे तोंड करुन उजव्या खांद्यावर जानवं ठेवून डाव्या हाताखाली घ्या, ताटलीत काळे तीळ सोडा. नंतर हातात काळे तीळ घेऊन आपल्या पूर्वजांचे आवाहन करा - ॐ आगच्छन्तु में पितर इमम ग्रहन्तु जलान्जलिम। नंतर पितृ तीर्थाने अर्थात अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या मधल्या भागाने तर्पण करा. 8. तर्पण करताना आपल्या गोत्राच्या नावासह म्हणा-गोत्रे अस्मत्पितामह (वडिलांचे नाव) वसुरूपत् तृप्यतमिदं तिलोदकम गंगा जलं वा तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः, तस्मै स्वधा नमः। या मंत्राने आजोबा आणि पणजोबांना तीन वेळा पाणी द्या. त्याचप्रमाणे तीन पिढ्यांची नावे घेतल्यावर पाणी द्या. या मंत्राचे पठण केल्यानंतर, जलांजली पूर्व दिशेने 16 वेळा, उत्तर दिशेने 7 वेळा आणि दक्षिण दिशेने 14 वेळा द्या. 9. ज्यांची नावे आठवत नाहीत त्यांनी रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा जी यांची नावे उच्चारली पाहिजेत. भगवान सूर्याला जल अर्पित करावं. मग कंड्यावर गूळ-गूळ-तुपाचा धूप द्या, धूप झाल्यानंतर पाच भोग काढा ज्याला पंचबली म्हणतात. 10. यानंतर, हातात पाणी घेतल्यानंतर, ॐ विष्णवे नम: ॐ विष्णवे नम: ॐ विष्णवे नम: असे म्हणत भगवान विष्णूच्या चरणी सोडा. अशाने पूर्वज आनंदी होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. पिंड दान: ( Pitru tarpan pind daan ) पिंड दान म्हणजे काय : तांदूळ पाण्यात भिजवून नंतर वितळल्यानंतर, गायीचे दूध, तूप, गूळ आणि मध एकत्र करून गोल - गोल पिंड बनवले जातात. जानवं उजव्या खांद्यावर घालून दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना पिंडो अर्पण करणे याला पिंड दान म्हणतात. ही धार्मिक श्रद्धा आहे की तांदूळाने बनवलेल्या पिंडांमुळे पूर्वज दीर्घकाळ समाधानी राहतात. पहिले तीन पिंड बनवतात. वडील, आजोबा आणि पणजोबा. जर वडील हयात असतील तर आजोबा, पणजोबा आणि पणजोबांच्या वडिलांची नावाने पिंड तयार केले जातात. 1. तर्पण किंवा पिंडदान करताना पांढरे कपडे घातले जातात आणि ही कृती फक्त दुपारीच करावी. 2. प्रथम पिंड तयार करा आणि नंतर तांदूळ, कच्चे सूत्र, मिठाई, फुले, जव, तीळ आणि दही यांच्यासह त्याची पूजा करा. पूजा करताना उदबत्ती लावावी. 3. पिंड दान किमान तीन पिढ्यांसाठी करावे. 4. पिंड हातात घेऊन, या मंत्राचा जप करताना 'इदं पिण्ड (पितरांचे नाव) तेभ्य: स्वधा' म्हणत नंतर पिंड अंगठा आणि तर्जनीच्या मधून सोडावे. 5. पिंड दान केल्यानंतर पूर्वजांचे ध्यान करा आणि पूर्वजांची देवता आर्यमाचेही ध्यान करा. 5. आता पिंड उचलून नदीत फेकून द्या. 6. पिंडदानानंतर पंचबली कर्म करा. म्हणजेच पाच सजीवांना खाऊ घाला. गोबली, श्वान बली, काकबली, देवादिबली आणि पिपलिकादि. गोबली म्हणजे गाईला अन्न, श्वान बली म्हणजे कुत्र्याला अन्न, काकबली म्हणजे कावळ्याला अन्न, देवादिबली म्हणजे देवी -देवतांना अन्न अर्पण करणे, पिपली बळी म्हणजे पिंपळाच्या झाडाला अन्न अर्पण करणे.

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 20 शेयर