#तुम विशेषाधिकारी हो~ हमारे सौरमण्डल के सभी ग्रहों में पृथ्वी ही विशेषाधिकारी है इतने विभिन्न रूप के जीवों का पोषण करने की। और सभी में मनुष्य अत्यधिक विशेषाधिकारी है क्योंकि वे ज्ञान के पोषण हो सकते हैं। और सभी बुद्धिमान व्यक्तियों में तुम सबसे ज्यादा विशेषाधिकारी हो..... अनुमान लगाओ क्यों ? जो यह नहीं समझते कि वे विशेषाधिकारी हैं, वे विशेष- अधिकारों से रहित हैं। पोषण वे भी करते हैं परन्तु वे सभी प्रकार की नकारात्मकता के पोषक हैं। बार-बार याद रखो कि तुम ही शांति हो, तुम प्रेम हो, आनन्द तुम हो और तुम ही सृष्टि-कर्ता के पोषक हो। यदि तुम यह नहीं समझते कि तुम पोषक हो, तब तुम्हारा जीवन निर्थक है। जैसे पंछी अपने घोंसलों में लौटते हैं, पुन: पुनः तुम अपने स्त्रोत में लौट आओ; केवल वहीं तुम अनुभव कर सकते हो कि तुम ही ईश्वर के पोषक हो।

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 13 शेयर

💦❗श्रीराम समर्थ❗💦 *अमृतधारा - १०* मनुष्य म्हणून जन्माला येणे आपल्या स्वाधीन नाही. पण जीवनाचा शेवट आपल्या हातात आहे तो साधणे खरे! वैभव वगैरे गोष्टी आपल्या हातातील नाहीत व त्या महत्वाच्या नाहीत. आपला कर्तेपणा कशातही नाही. जगणेही आपल्या स्वाधीन नाही. हा सर्वांचा व्यवहाराचा अनुभव आहे. कर्तेपणात दुःख आहे. त्याविना रहाणे हे खरे. सर्व करुन अकर्तेपणाने रहावे. गरीबी श्रीमंती हा प्रारब्धा चा विषय आहे. प्रयत्न जरूर करावा. कारण भगवंताला तेच आवडते. पण त्याला आसक्ती आवडत नाही. फळांची तळमळ, धडपड, काळजी भगवंताला आवडत नाही. ते सर्व आपल्या जवळ आहे. आपण कर्तव्या पुरते रहावे. यश देणे न देणे भगवंताच्या हातात आहे. कर्तव्यात समाधान आहे. फळात नाही. कर्तव्य न चुकणे हे खरे चांगलेपण आहे. काळजी घ्यावी पण काळजी करू नये. काळजी करण्यात काळाचा विचार, भगवंताचा विसर दोन्ही आहेत. भगवंताच्या प्राप्ती करता जगावे. पोटाला मिळवण्यात नाही तर भगवंत मिळवण्यात कर्तबगारी आहे. *आशीर्वाद.* 🌷☘💧

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

💧❗श्रीराम समर्थ❗💧 *अमृतधारा - ११७* माणूस लहानाचा मोठा होतो व त्याचा म्हातारा होतो. पण माणसात फारसा फरक पडत नाही. म्हातारपणी मी कसाही असो तरी माझे ऐकावे असे वाटते. ते दुःखाचे मूळ आहे. माझे लोकांनी कां ऐकावे? मी लोकांचे कां ऐकू नये ? मला बरोबर (सर्व) माहिती आहे असे कोठे आहे. म्हातारपणी आपले ऐकले नाही तर मनावर परिणाम होतो. पुष्कळांना भ्रम होतो तो होऊ देता उपयोगी नाही. 1) मनावर परिणाम होऊ न देणे हाच परमार्थ. 2) शरीरावर परिणाम होऊ न देणे हा प्रपंच. दुसरे स्वाधीन नाही तरीही सर्व प्रयत्न आपण त्याकरिता करतो. पहिले स्वाधीन आहे तरी त्यासाठी आपण काही करीत नाही. एकूण दोन्हीकडून प्राप्ती नाही. *आशिर्वाद.*

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

💦❗श्रीराम समर्थ❗💦 *अमृतधारा - ०६* भगवंताच्या स्मरणात कर्म करणे हिच नीती होय. भगवंताचे विस्मरण झाल्या शिवाय अनीती होणार नाही. माझ्या कृतीला भगवंत पाहतो या भावनेने वागावे. कर्म काही सुटत नाही. अभिमानाचे कर्म बंधनाला कारण होते. मग कर्म करुनही कर्म मारता कसे येईल ? कर्म बंधन नाहीसे करायला तीन मार्ग आहेत 1) कर्ता मी नाही. बुध्दी व कर्तुत्व भगवंताचे आहे. त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो. आपण आरोपी म्हणून कर्म न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे. 2) जसे फणसाचा चीक टाळायला हाताला तेल लावतात, तसे प्रत्येक कर्मात भगवंताचे अनुसंधान ठेवून ते कर्म करावे. 3) कोणतेही कर्म देवाला अर्पण करावे. द्वैतबुध्दी नाहीशी व्हायला या पध्दतीने कर्म करावे. *आशीर्वाद.* 💧🌼🌷

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर