🌹 *अध्यात्म* 🌹 *शिवमहिमा* खरे तर शिव मूर्तिरुप नाहीत. शिवलिंग म्हणजे सर्व जीवांच्या ठिकाणी असणारे ज्योती स्वरूपच होय. आपल्या मेंदुतील ज्ञानतंतुंचा सहकारी रुद्र असल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळते म्हणून शिवाला ‘कपाली’ म्हणतात. राग, ताल, बद्द, स्थिती व लय रूप असणाऱ्या सृष्टीच्या स्पंदनानुसार शिव तांडव करतात, म्हणून त्यांना नटराज म्हटले आहे. शिव आकाशरूप असल्यामुळे त्यांस दिगंबर देखिल म्हणतात. शिव हे लिंगस्वरूप आहेत. संपूर्ण भारत भूमिवर बारा ज्योतिर्लिंग म्हणजे बारा राशींचे प्रतीक आहेत. म्हणून शिव काळ स्वरूप आहेत. पंचमहाभूते हे शिवाचे पंचमुख आहेत. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व मन मिळून एकादश रुद्रकला होतात, यालाच अकरा रुद्र म्हणतात. शिवाचा तीसरा डोळा म्हणजे ज्ञाननेत्र होय. त्यांच्या जटेतून परम् पवित्र स्वर्गातुन आलेली गंगा वाहते. शिवाजवळ भुत, प्रेत, पिशाच्य असे अनेक गण असतात. साधक योग अभ्यासात जसजसा पुढे जाईल तेथे हे गण अनेक अडचणी निर्माण करतात. प्रत्येक देवतेच्या हातात काहीना काही शस्त्र असते. त्याचप्रमाणे शिवाच्या हातात त्रिशूळ हे शस्त्र आहे. त्याची तीन टोके म्हणजे सत्व, रज, तम या गुणांची सूचक आहेत. आणि हा त्यांचा एकत्रितपणा म्हणजे त्रिगुणातीत असे आहे. हा त्रिशूळाचा गुह्य अर्थ आहे. आपल्या त्रिपुटीच्या ठिकाणी इड़ा, पिंगला, सुषुम्ना नाडीच्या द्वारे होणाऱ्या श्वास प्रवाहाचा त्रिवेणी संगम म्हणजे त्रिशूळ हा दूसरा अर्थ होय. नाग हे शिवाचे आभूषण आहे. शिवाला जागृत करणारी कुंडलिनी शक्ती ही सर्पाकारातच असते. शिवालाच ईश्वर देखील म्हटले आहे. शिवाच्या त्रिशूळाला डमरू बांधलेले असते. मंत्रजाप केल्याने त्याची स्पंदने डमरुच्या नादासारखी असतात. या नादात शिव तांडव करतात म्हणून त्यांना ‘डमरुधारी’ म्हणतात. शिव स्मशानात वास करतात. शिव आपल्या कपाळी भस्म देखील लावतात. शिवाचे अर्धनारीश्वर रूप असून ते विश्वाचे मातापिता म्हणून चराचर सृष्टिचे संचालन करतात. शिवाचे वाहन नंदी आहे. शिवाची आराधना शिवपंचाक्षरी मंत्राने केली जाते. शिवाला अभिषेक अत्यंत प्रिय आहे. शिवलिंगावर सतत जलाची धार धरली जाते. शिवाच्या शिरोभागी चंद्रकोर असते. शिवाच्या आश्रुंपासुन रुद्राक्ष निर्माण झालेत असे म्हणतात. शिवभक्त आवडीने ते आपल्या गळ्यात घालतात. पांढरे रुद्राक्ष घालु नये ते निषिद्ध मानले आहे. तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष ठेऊन त्यावर पळीने पाण्याची धार धरल्यास ते प्रदक्षिणे सारखे फिरते ते चांगले रुद्राक्ष समजावे. एकमुखी रुद्राक्ष शिवस्वरूप असतो. द्विमुखी-अर्धनारीश्वर, त्रिमुखी-अग्निस्वरूप, चतुर्मुखी-ब्रम्हस्वरूप, पंचमुखी-कालाग्नि वगैरे. रुद्राक्षांचे देवता स्वरूपाशी जवळचे संबंध आहेत. तंत्र, मंत्र, विद्या व शक्ती या वाघासारख्या असतात. त्यांना काबूत ठेवणारा शिवच आहे. वाघ हे शक्तीचे वाहन आहे, त्यामुळे त्याचे सूचक म्हणून शिवाने वाघाचे कातडे धारण केले आहे. शिवप्राप्ति कशी करावी हे तुम्ही योग्य मार्गदर्शाकाकडून समजून घ्या. *संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 0 शेयर

लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचवा !! 'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार-चौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. या सोबततिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिचीपरिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र यानवरेलोकांचं दुर्लक्ष होतं,नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा. - उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळीजरा हे वास्तवही लक्षात घे. - ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल. - ती देखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील,आवडी असतील, - तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं.. - ती सुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगीम्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच! - तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा,बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील, - आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर,प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल. - पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल - नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल. - सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल, - तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल, - तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल. - नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणित्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील... - तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात. - तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या,अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासून ही दूर राहते. - कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही. मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा,जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत... एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

+9 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

या लेखानरूप ही सुंदर आणि बोधप्रत कविता.... विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया... काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया मिळणार नाही तुला आई-बापाची माया... तुला मिळेण बगला माडी , शेती बाडी मोटार गाडी आई-बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया... काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया मिळणार नाही तुला आई-बापाची माया... तुला मिळेन पैका -पोर , गणगोत्र मित्र-परिवार स्वार्थानी गुरफटेलेला हा मायेचा बाजार विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया... काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया मिळणार नाही तुला आई-बापाची माया... आई-बाप जिवंत असता नाही केली सेवा ते मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा-देवा ' बुन्धी लाडवाचा ' जेवण करुणी मग म्हणतो जेवा-जेवा विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया... काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया मिळणार नाही तुला आई-बापाची माया... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी तु समजून उमजून घे वेडया होऊ नको अविचारी जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया विसरू नको रे आई-बापाला झीजवली ज्याने काया... काया झिजवून तुझ्या शिरावर , धरिली सुखाची छाया र वेडया मिळणार नाही तुला आई-बापाची माया...

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

🌹🕉️👏 *_येथे शंकरा समोर नंदी नाही._* *_कपालेश्वर शिवमंदिर_* *नासिक* नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही. येथे नंदी का नाही याचीही पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरली होती. त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश (शंकर) यात वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्‍या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत होते. एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोर्‍हा (नंदी) एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोर्‍हा म्हणाला की, ' मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण घालायला आल्यावर मी त्याला मारणार'. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, ' तू हे जर केलेस तर तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजेच ब्रह्महत्येचे पातक लागेल'. त्यावर तो नंदी म्हणाला, 'मला त्यावरचा उपाय माहीत आहे.' दुसर्‍या दिवशी ब्राह्मण गोर्‍ह्यास वेसण घालायला आला असताना, नंदीने त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे काय होतेय हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागला. त्यानंतर त्या नंदीने गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग त्याला परत मिळाला. ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान शंकराची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. *_त्यावर 'तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू माझ्यासमोर बसू नकोस तू माझ्या गुरुसमान आहेस' असे शंकराने नंदीस सांगितले._* त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12 ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचे महत्त्व आहे, असे सांगितले जाते. हे मंदिर टेकडीवर आहे. आता आजूबाजूला वस्ती झाली आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. पूर्वी येथे फक्त पिंड होती. पण पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आजचे स्वरूप त्याला मिळाले. या मंदिराच्या पायर्‍या उतरून खाली आले की समोर गोदावरी नदी आहे. तेथेच प्रसिद्ध रामकुंड आहे. याच रामकुंडात भगवान रामाने आपल्या पित्याचे श्राद्ध केले होते. येथे इतरही बरीच मंदिरे आहेत. कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर व सुंदर नारायण या दोन्ही मंदिरातून अनुक्रमे शंकर व विष्णू या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. व त्यांची भेट घडवली जाते. तेथे त्यांच्यावर अभिषेक करण्यात येतो. यानिमित्ताने मोठा उत्सव होतो. याशिवाय कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. श्रावणी सोमवारीही या मंदिरात मोठी गर्दी असते... *जय श्रीकपालेश्वर महादेव* 👏

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 0 शेयर