संत तुकाराम

नको नको मना गुंतु माया जाळी । काळ आला जवळी ग्रासावया । *------ संत तुकाराम महाराज* ********************** *नको नको मना गुंतु माया जाळी।काळ आला जवळी ग्रासावया ।१।।* *काळाची उडी पडेल बा जेव्हा । सोडवीना तेव्हा माय बाप ।।२।।* *सोडविना बंधु पाठीची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ।।३।।* *सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोयरे भली भली ।।४।।* *तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणी वाचूनि त्या ।।५।।* *संत तुकाराम महाराज []*************** *भावार्थ : ---* हे मना ! जीवनाच्या अंती भगवंतच तारणारा असून तूं नाहक प्रपंचाच्या मोहात पडू नकोस. कारण बहिण, भाऊ, पत्नी व अपत्य किंवा सोयरे हे फक्त सुखाचे सोबती आहेत. अंतःकाळी फक्त आपले सत्कार्य व भगवंत भक्ती कामाला येते. या अशास्वत व मायावी जीवनाचे मर्माचे मनाला उपदेश महाराज करतात. *🙏🌺जय जगद्गुरू🌺🙏* *🌺राम कृष्ण हरी🌺* *🌹मंगल प्रभात🌹*

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*🌹🙏जय हरि विठ्ठल🙏🌹* *तुम्हा आम्हा उरी तोंवरी!* *जनाचारी आहे तैसी!!* *माझे घोंगडे टाकून देई!* *एके ठायी मग असो!!* *विरोधाने पडे तुटी!* *कपट पोटी नसावे!!* *तुका म्हणे तू जाणता हरि!* *मज वेव्हारी बोलविसी!!* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *समाजातील लोकांच्या बरोबर व्यवहार करावा लागतो. म्हणून त्यासाठी देहाशी तादात्म्य आहे. त्यामुळे तू देह व मी उपासक असा द्वैतभाव भेद आहे.* *माझ्या शरीरात द्वैतरुपी टाकलेली घोंगडी दूर कर. म्हणजे आपले ऐक्य राहील.* *द्वैत अद्वैत हा विरोध राहिला तर दुरावा निर्माण होतो. म्हणून अंतःकरणात कोणत्याही प्रकारचे द्वैत, कपट नसावे.* *तुकाराम महाराज म्हणतात, हे हरि! तू सर्वज्ञ आहेस. पण मला मात्र प्रपंचा संबंधी बोलावयास लावतो.* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏*

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर