शुभ सकाळ

येत्या दहा-पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोकं थोडे वेगळेच आहेत ! सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अन्न- धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे ; आणि तरीही उरलं तर गरीबाला देणारे किंवा दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे! पाहुणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच जेवणारे ! असे लोकं आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत! ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबरच जाईल! *समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण ह्या जगातून कायमचीच नाहीशी होईल !!* त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन,वखवख, असंवेदनशील मनं, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य ; अन् सारं आभासी तथाकथित जीवन! *कटू आहे पण हेच सत्य आहे !!* 🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

+12 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 14 शेयर
Kalpana B R Oct 16, 2021

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Kalpana B R Oct 16, 2021

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Kalpana B R Oct 16, 2021

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर