शिष्य

तुमच्यावर गुरुकृपा आहे म्हणजे खऱ्या अर्थाने काय ? गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरु कृपा... एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे गुरु कृपा... कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, ती ताकत म्हणजे गुरु कृपा... 'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरु कृपा... अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरु कृपा... प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे गुरु कृपा.... पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले ' समाधान ' म्हणजे गुरु कृपा....

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

*🙏🏻🌷.. मेघवृष्टिनें करावा उपदेश । परि गुरुनें न करावा शिष्य । वाटा लाभे त्यास । केल्या अर्धकर्माचा ॥१॥* *द्रव्य वेचावें अन्नछत्रीं । भूतीं द्यावें सर्वत्र । न घ्यावा हा पुत्र । उत्तम याती पोसणा ॥२॥* *बीज न पेरावें खडकीं । ओल नाही ज्याचे बुडखीं । थीतां ठके शेखीं । पाठी लागे दिवाण ॥३॥* *गुज बोलावें संतांसी । पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी । वाटां पावे कर्माचा ॥४॥* *शुद्ध कसुनि पाहाबें । वरिला रंगा न भुलावें । तुका म्हणे घ्यावें । जया नये तुटी तें ॥५॥* *🙏🏻🌷...विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌷🙏🏻* *🙏🏻🌷.. शुभ सकाळ.. 🌷🙏🏻*

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर