[17/10, 12:47 pm] बिपीन रा. वाघमळे: 🌺🌺 *नारद भक्तिसुत्र* 🌺🌺 *भाग- 2* *सुत्र- 1* भाग एक मध्ये आपण पहिल्या सुत्राचा विचार करत असताना *अथतो भक्तिं व्याख्यास्यामः* यामध्ये " अतः " या शब्दाचा विचार करत होतो. अतः या शब्दाने नारद हे सुचित करतात की, ऐहिक व पारत्रिक ब्रम्हलोकापर्यंत भोग प्राप्त झाले तरी विनाभगवत्प्रेमाच्या मनुष्यास खरी शांती- वास्तवसुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. मनुष्य तर त्या शांतीचा भुकेला आहे. 'अत, या कारणास्तव- आम्ही भक्तिचे व्याख्यान करतो. या लोकात जे जे दृष्टिगोचर आहे कालपरत्वे सर्व एक दिवस नाश होणार आहे संत वचन हि तसेच आहेत. *अवघाची आकार ग्रासियेला काळे!!* याचा अर्थ सर्व नाश होणार आहे, शास्त्रही तेच सांगते *यद् दृष्टम् तद् नष्टं !* जे दिसतयं ते एक दिवस नष्ट होणार आहे. ज्याने शरीर धारण केले आहे त्याला एक दिवस या शरीराचा त्याग करावाच लागणार आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यु हा होणारच या संसाराच चक्र आहे ज्याचा मृत्यु झाला तो पुन्हा जन्माला येणार माऊली वर्णन करतात *उपजे ते नाशे! नाशिले ते पुनरपि दिसे! हे घटिका यंत्र जैसे! परीभ्रमे गा!!* किंवा आद्यगुरु शंकराचार्य चर्पटपंजरिका स्तोत्रात वर्णन करतात *पुनरपि जननं पुनरपि मरणं ! पुनरपि जननी जठरे शयनं! इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे!!7!!* हे सर्व जन्माला येणं आणि मृत्यु होणे हे अगणित कालापासून चालत आलेले आहे. आणि हे तर दुःखाला कारण आहे जन्म आणि मृत्यु याच दुःख भयावह सांगितले आहे. *जन्ममृर्त्युसमं दुःखं न भुतो न भविष्यति!* म्हणून संसार दुःखरुप आहे संसारातील प्रत्येक वस्तु परीछिन्न, असत्, जड, सत्ताशुन्य अशा आहेत. केवळ परमात्माच एकमेव सत्-चित्-आनंदस्वरुप आहे. आणि त्रिविध दुःख निवारण करणारा आहे श्रीमद्भागवत महात्म्याच्या पहिल्या अध्यायात पहिल्याच श्लोकात वर्णन आहे *सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे! तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः!!1!!* जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तिनही ताप जे नाहीसे करतात त्या सच्चिदानन्दस्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्हि स्तुति करतो. तो सच्चिदानन्दरूप भगवान परमात्मा अविनाशी आहे तो आमच्या ह्रदयाला सोडून कधीच राहात नाही तो एकमेव सुखप्रदाता आहे "अतः "या कारणास्तव नाशवंत दुःखरुप अशा संसारातुन सुटून अविनाशी सत्य व सुखस्वरुप परमात्म्याची प्राप्ती व्हावी या प्रयोजनाच्या इच्छेने भक्तिच्या व्याख्यानास आरंभ केला जातो. येथे *भक्ति व्याख्यास्यामः!* अशी प्रतिज्ञा आहे. हे करण्याचे कारण वेद, ऊपनिषदे, धर्मशास्त्र, वेदान्तशास्त्रावरील सर्व दर्शनावर सुत्रे आहेत पण भक्तिशास्त्रावर योग्य प्रकारे सुत्र रचलि गेलि नाही. या कलियुगात मानवाच्या उध्दाराकरता तेच एकमेव साधन आहे. म्हणुन देवर्षीनारदांनी प्रतिज्ञापुर्वक सुत्रांचि रचना केली असावि असे वाटते. देवर्षीनारदांचे पिता ब्रम्हदेव यांनी त्यांना असा आदेशच दिला होता *यथा हरौ भगवतिनृणां भक्तिर्भविष्यति!!* ज्यायोगे मानवांची भगवंताचे ठिकाणी भक्ति निर्माण होईल असा प्रचार कर. नारदांनी भक्तिदेविपुढे स्वतः अशी प्रतिज्ञा केलि होती. *अन्यधर्मान्स्तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान्!!* *तदानाहं हरेर्दासो लोकेत्वां न प्रवर्तये!!* अन्य सर्व धर्माची उपेक्षा करुन मी सर्व लोकांत मोठ्या उत्साहाने तुझी (भक्तिची) स्थापना न करीन तर मी श्रीहरीचा सेवक होऊ शकत नाही. श्रृतिही असे भगवद्भक्तिचे अगाध महात्म्य उद्घोषपुर्वक सांगते. *भक्तिरेवैनं नयति! भक्तिरेवैनं दर्शयति! भक्तिरेवैनं गमयति! भक्तिवशः पुरुषः! भक्तिरेव भूयसी!!* (त्रिपाद्विभुति उप.) म्हणून "भक्तिं व्याख्यास्यामः " असे नारद प्रतिज्ञापुर्वक सांगतात. येथे व्याख्यास्यामः म्हटले आहे, कथन करतो, सांगतो असे म्हटले नाही. " व्याख्यास्यामः " वि- आ- ख्यास्यामः "वि " म्हणजे विशेषरुपाने, "आ " म्हणजे योग्य प्रकारे, " ख्यास्यामः " म्हणजे वर्णन निरुपण करत आहेत असा विशेष अर्थ या पदातुन निर्माण होतो. दुसरे असे कि प्रत्येक शास्त्रात, पुराणात, भक्तिचे वर्णन केलेले आहे परंतु ते वर्णन कर्ममिश्रा, ज्ञानमिश्रा; सात्विक, राजस्थान, तामस, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू हे भक्तिचे वर्णन आहे. परंतु नारदांनी विशेषरुपाने तिच्यामध्ये कोणाचेही मिश्रण नाही अशा शुध्द भक्तिचे वर्णन केलेले आहे. प्रथम सुत्रात भक्तिचे व्याख्यान करु अशी प्रतिज्ञा केलि आहे. पण शास्त्रसिध्दान्त असा आहे की, *नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिध्दि, अपितु तु लक्षण प्रणभ्यां वस्तुसिध्दिः!* म्हणजे एखादी वस्तु प्रगट करतो एवढे म्हणण्याने त्या वस्तूची सिध्दि होत नाही तर त्या वस्तुच्या (प्रमेयाच्या) लक्षण व प्रमाणांनीच ती सिध्द होते *असाधारणधर्मो लक्षणं* वस्तुचा असाधारण म्हणजे तेथेच राहाणारा, अन्यत्र न दिसुन येणारा जो धर्म त्यास लक्षण असे म्हटले जाते. शास्त्रीय दृष्टिने कोणत्याहि विषयाचे प्रथम लक्षण ठरवावे लागते म्हणजे त्याचा असाधारण धर्म सांगावा लागतो. जर तसा धर्म सांगितला नाहि तर त्या वस्तूचे सामान्य ज्ञान झाले तरी विशेष रूपाने यथार्थ ज्ञान होणार नाही. केवळ सामान्य ज्ञान हे अकिंचित्कर आहे. तसेच प्रमाणही पाहिजे. म्हणजे योग्य प्रमाणाने ती वस्तु सिध्द झालि तरच ती अबाधित, अर्थप्रतिपादक ठरते येथे नारद वचन हेच प्रमाण आहे. प्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादि अनेक मानलि जातात. त्यात अतींद्रियअर्थप्रतिपादनामध्ये प्रत्यक्षादि प्रमाणाची आवश्यकता नाही. तेथे शब्द प्रमाणच उपयुक्त आहे. वेद, उपनिषद, पुराणे, सुत्रे, स्मृती इत्यादिकांना जसे प्रामाण्य आहे तसेच *आप्तवाक्यालाही* प्रामाण्य आहे. "आप्तस्तु यथार्थ वक्ता" असे आप्ताचे लक्षण आहे. लौकिक व अलौकिक असे आप्ताचे प्रकार संभवतात. लौकिक व्यवहारीक वस्तुचे ज्ञान करु देणारे ते लौकिक आप्त व अलौकिक म्हणजे अन्य लौकिक प्रमाणांना अगोचर असे ज्ञान, भक्ति, प्रेम, यांचे यथार्थ कथन करणारे ते अलौकिक आप्त होत. श्रीनारदमहर्षी असे यावन्मानवमात्राचे कल्याण चिंतणारे अलौकिक आप्त होत अर्थात तेच या भक्तीचे लक्षण सांगु शकतात, श्रीनारद हे प्रत्यक्ष भगवद्विभूतिस्वरुप आहेत. *"देवर्षीणांच नारदः!* असे गीता अध्याय दहाव्यात श्रीकृष्णच सांगतात. म्हणूनच नारदांनी केलेल्या या भक्तिलक्षणाला महत्व आहे. श्रीगुरु चरणी समर्पित 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 *संकलन* *नारद भक्तिसुत्र* *ह.भ.प. रामभाऊ महाराज नादीकर* *मो.- 8007272974 / 9284252201* [17/10, 12:47 pm] बिपीन रा. वाघमळे: नारद हे सुचित करतात की, ऐहिक व पारत्रिक ब्रम्हलोकापर्यंत सर्व भोग प्राप्त झाले तरी, *विनाभगवत्प्रेमाच्या मनुष्यास खरी शांती- वास्तवसुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. मनुष्य तर त्या शांतीचा भुकेला आहे,* या कारणास्तव- आम्ही भक्तिचे व्याख्यान करतो. या लोकात जे जे दृष्टिगोचर आहे, कालपरत्वे सर्व एक दिवस नाश होणार आहे. ज्याने शरीर धारण केले आहे त्याला एक दिवस या शरीराचा त्याग करावाच लागणार आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यु हा होणारच, या संसाराच चक्र आहे ज्याचा मृत्यु झाला तो पुन्हा जन्माला येणार. माऊली वर्णन करतात : *उपजे ते नाशे! नाशिले ते पुनरपि दिसे! हे घटिका यंत्र जैसे! परीभ्रमे गा!!* संसार दुःखरुप आहे संसारातील प्रत्येक वस्तु परीछिन्न, असत्, जड, सत्ताशुन्य अशा आहेत. केवळ *परमात्माच एकमेव सत्-चित्-आनंदस्वरुप आहे. आणि त्रिविध दुःख निवारण करणारा आहे.* जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानन्दस्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुति करतो. *तो सच्चिदानन्दरूप भगवान परमात्मा अविनाशी आहे तो आमच्या ह्रदयाला सोडून कधीच राहात नाही, तो एकमेव सुखप्रदाता आहे.* या कारणास्तव नाशवंत दुःखरुप अशा संसारातुन सुटून अविनाशी सत्य व सुखस्वरुप परमात्म्याची प्राप्ती व्हावी, या प्रयोजनाच्या इच्छेने भक्तिच्या व्याख्यानास आरंभ केला जातो. अशी या कलियुगात मानवाच्या उध्दाराकरता तेच एकमेव साधन आहे. ज्यायोगे मानवांची भगवंताचे ठिकाणी भक्ति निर्माण होईल असा प्रचार कर. नारदांनी भक्तिदेविपुढे स्वतः अशी प्रतिज्ञा केली होती. मोठ्या उत्साहाने तुझी (भक्तिची) स्थापना न करीन तर मी श्रीहरीचा सेवक होऊ शकत नाही. *🟣"नारदांनी विशेषरुपाने तिच्यामध्ये कोणाचेही मिश्रण नाही, अशा शुध्द भक्तिचे वर्णन केलेले आहे.* 🌺 *नारद भक्तिसुत्र* 🌺 *भाग- 2 , सुत्र- 1* *१७,१०,२१,रवि.s.n.b.1:52 pm. plg.*

[17/10, 12:47 pm] बिपीन रा. वाघमळे: 🌺🌺 *नारद भक्तिसुत्र* 🌺🌺
        *भाग- 2*
        *सुत्र- 1*
भाग एक मध्ये आपण पहिल्या सुत्राचा विचार करत असताना *अथतो भक्तिं व्याख्यास्यामः* यामध्ये " अतः " या शब्दाचा विचार करत होतो. अतः या शब्दाने नारद हे सुचित करतात की, ऐहिक व पारत्रिक ब्रम्हलोकापर्यंत भोग प्राप्त झाले तरी विनाभगवत्प्रेमाच्या मनुष्यास खरी शांती- वास्तवसुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. मनुष्य तर त्या शांतीचा भुकेला आहे. 'अत, या कारणास्तव- आम्ही भक्तिचे व्याख्यान करतो. 
या लोकात जे जे दृष्टिगोचर आहे कालपरत्वे सर्व एक दिवस नाश होणार आहे संत वचन हि तसेच आहेत. *अवघाची आकार ग्रासियेला काळे!!* याचा अर्थ सर्व नाश होणार आहे, शास्त्रही तेच सांगते *यद् दृष्टम् तद् नष्टं !* जे दिसतयं ते एक दिवस नष्ट होणार आहे. ज्याने शरीर धारण केले आहे त्याला एक दिवस या शरीराचा त्याग करावाच लागणार आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यु हा होणारच या संसाराच चक्र आहे ज्याचा मृत्यु झाला तो पुन्हा जन्माला येणार माऊली वर्णन करतात *उपजे ते नाशे! नाशिले ते पुनरपि दिसे! हे घटिका यंत्र जैसे! परीभ्रमे गा!!* किंवा आद्यगुरु शंकराचार्य चर्पटपंजरिका स्तोत्रात वर्णन करतात *पुनरपि जननं पुनरपि मरणं ! पुनरपि जननी जठरे शयनं! इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे!!7!!* हे सर्व जन्माला येणं आणि मृत्यु होणे हे अगणित कालापासून चालत आलेले आहे. आणि हे तर दुःखाला कारण आहे जन्म आणि मृत्यु याच दुःख भयावह सांगितले आहे. *जन्ममृर्त्युसमं दुःखं न भुतो न भविष्यति!* म्हणून संसार दुःखरुप आहे संसारातील प्रत्येक वस्तु परीछिन्न, असत्, जड, सत्ताशुन्य अशा आहेत. केवळ परमात्माच एकमेव सत्-चित्-आनंदस्वरुप आहे. आणि त्रिविध दुःख निवारण करणारा आहे श्रीमद्भागवत महात्म्याच्या पहिल्या अध्यायात पहिल्याच श्लोकात वर्णन आहे *सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे! तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः!!1!!*
जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक असे तिनही ताप जे नाहीसे करतात त्या सच्चिदानन्दस्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्हि स्तुति करतो. 
तो सच्चिदानन्दरूप भगवान परमात्मा अविनाशी आहे तो आमच्या ह्रदयाला सोडून कधीच राहात नाही तो एकमेव सुखप्रदाता आहे "अतः "या कारणास्तव नाशवंत दुःखरुप अशा संसारातुन सुटून अविनाशी सत्य व सुखस्वरुप परमात्म्याची प्राप्ती व्हावी या प्रयोजनाच्या इच्छेने भक्तिच्या व्याख्यानास आरंभ केला जातो. येथे *भक्ति व्याख्यास्यामः!* अशी प्रतिज्ञा आहे. हे करण्याचे कारण वेद, ऊपनिषदे, धर्मशास्त्र, वेदान्तशास्त्रावरील सर्व दर्शनावर सुत्रे आहेत पण भक्तिशास्त्रावर योग्य प्रकारे सुत्र रचलि गेलि नाही. या कलियुगात मानवाच्या उध्दाराकरता तेच एकमेव साधन आहे. म्हणुन देवर्षीनारदांनी प्रतिज्ञापुर्वक सुत्रांचि रचना केली असावि असे वाटते. देवर्षीनारदांचे पिता ब्रम्हदेव यांनी त्यांना असा आदेशच दिला होता *यथा हरौ भगवतिनृणां भक्तिर्भविष्यति!!*
ज्यायोगे मानवांची भगवंताचे ठिकाणी भक्ति निर्माण होईल असा प्रचार कर. नारदांनी भक्तिदेविपुढे स्वतः अशी प्रतिज्ञा केलि होती. 
*अन्यधर्मान्स्तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान्!!*
*तदानाहं हरेर्दासो लोकेत्वां न प्रवर्तये!!*
अन्य सर्व धर्माची उपेक्षा करुन मी सर्व लोकांत मोठ्या उत्साहाने तुझी (भक्तिची) स्थापना न करीन तर मी श्रीहरीचा सेवक होऊ शकत नाही. श्रृतिही असे भगवद्भक्तिचे अगाध महात्म्य उद्घोषपुर्वक सांगते. 
*भक्तिरेवैनं नयति! भक्तिरेवैनं दर्शयति! भक्तिरेवैनं गमयति! भक्तिवशः पुरुषः! भक्तिरेव भूयसी!!* (त्रिपाद्विभुति उप.)
म्हणून "भक्तिं व्याख्यास्यामः " असे नारद प्रतिज्ञापुर्वक सांगतात. येथे व्याख्यास्यामः म्हटले आहे, कथन करतो, सांगतो असे म्हटले नाही. " व्याख्यास्यामः " वि- आ- ख्यास्यामः "वि " म्हणजे विशेषरुपाने, "आ " म्हणजे योग्य प्रकारे, " ख्यास्यामः " म्हणजे वर्णन निरुपण करत आहेत असा विशेष अर्थ या पदातुन निर्माण होतो. 
दुसरे असे कि प्रत्येक शास्त्रात, पुराणात, भक्तिचे वर्णन केलेले आहे परंतु ते वर्णन कर्ममिश्रा, ज्ञानमिश्रा; सात्विक, राजस्थान, तामस, आर्त, अर्थार्थी,  जिज्ञासू हे भक्तिचे वर्णन आहे. परंतु नारदांनी विशेषरुपाने तिच्यामध्ये कोणाचेही मिश्रण नाही अशा शुध्द भक्तिचे वर्णन केलेले आहे. प्रथम सुत्रात भक्तिचे व्याख्यान करु अशी प्रतिज्ञा केलि आहे. पण शास्त्रसिध्दान्त असा आहे की, *नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिध्दि, अपितु तु लक्षण प्रणभ्यां वस्तुसिध्दिः!*
म्हणजे एखादी वस्तु प्रगट करतो एवढे म्हणण्याने त्या वस्तूची सिध्दि होत नाही तर त्या वस्तुच्या (प्रमेयाच्या) लक्षण व प्रमाणांनीच ती सिध्द होते *असाधारणधर्मो लक्षणं* वस्तुचा असाधारण म्हणजे तेथेच राहाणारा, अन्यत्र न दिसुन येणारा जो धर्म त्यास लक्षण असे म्हटले जाते. शास्त्रीय दृष्टिने कोणत्याहि विषयाचे प्रथम लक्षण ठरवावे लागते म्हणजे त्याचा असाधारण धर्म सांगावा लागतो. जर तसा धर्म सांगितला नाहि तर त्या वस्तूचे सामान्य ज्ञान झाले तरी विशेष रूपाने यथार्थ ज्ञान होणार नाही. केवळ सामान्य ज्ञान हे अकिंचित्कर आहे. तसेच प्रमाणही पाहिजे. म्हणजे योग्य प्रमाणाने ती वस्तु सिध्द झालि तरच ती अबाधित, अर्थप्रतिपादक ठरते येथे नारद वचन हेच प्रमाण आहे. प्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादि अनेक मानलि जातात. त्यात अतींद्रियअर्थप्रतिपादनामध्ये प्रत्यक्षादि प्रमाणाची आवश्यकता नाही. तेथे शब्द प्रमाणच उपयुक्त आहे. वेद, उपनिषद, पुराणे, सुत्रे, स्मृती इत्यादिकांना जसे प्रामाण्य आहे तसेच *आप्तवाक्यालाही* प्रामाण्य आहे. "आप्तस्तु यथार्थ वक्ता" असे आप्ताचे लक्षण आहे. लौकिक व अलौकिक असे आप्ताचे प्रकार संभवतात. लौकिक व्यवहारीक वस्तुचे ज्ञान करु देणारे ते लौकिक आप्त व अलौकिक म्हणजे अन्य लौकिक प्रमाणांना अगोचर असे ज्ञान, भक्ति, प्रेम, यांचे यथार्थ कथन करणारे ते अलौकिक आप्त होत. श्रीनारदमहर्षी असे यावन्मानवमात्राचे कल्याण चिंतणारे अलौकिक आप्त होत अर्थात तेच या भक्तीचे लक्षण सांगु शकतात, श्रीनारद हे प्रत्यक्ष भगवद्विभूतिस्वरुप आहेत. *"देवर्षीणांच नारदः!* असे गीता अध्याय दहाव्यात श्रीकृष्णच सांगतात. म्हणूनच नारदांनी केलेल्या या भक्तिलक्षणाला महत्व आहे. 

श्रीगुरु चरणी समर्पित 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

*संकलन*
*नारद भक्तिसुत्र*
*ह.भ.प. रामभाऊ महाराज नादीकर*
*मो.- 8007272974 / 9284252201*
[17/10, 12:47 pm] बिपीन रा. वाघमळे: नारद हे सुचित करतात की, ऐहिक व पारत्रिक ब्रम्हलोकापर्यंत सर्व भोग प्राप्त झाले तरी, *विनाभगवत्प्रेमाच्या मनुष्यास खरी शांती- वास्तवसुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. मनुष्य तर त्या शांतीचा भुकेला आहे,* या कारणास्तव- आम्ही भक्तिचे व्याख्यान करतो. 
या लोकात जे जे दृष्टिगोचर आहे, कालपरत्वे सर्व एक दिवस नाश होणार आहे. ज्याने शरीर धारण केले आहे त्याला एक दिवस या शरीराचा त्याग करावाच लागणार आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यु हा होणारच, या संसाराच चक्र आहे ज्याचा मृत्यु झाला तो पुन्हा जन्माला येणार. माऊली वर्णन करतात : *उपजे ते नाशे! नाशिले ते पुनरपि दिसे! हे घटिका यंत्र जैसे! परीभ्रमे गा!!* 
 संसार दुःखरुप आहे संसारातील प्रत्येक वस्तु परीछिन्न, असत्, जड, सत्ताशुन्य अशा आहेत. केवळ *परमात्माच एकमेव सत्-चित्-आनंदस्वरुप आहे. आणि त्रिविध दुःख निवारण करणारा आहे.*
जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानन्दस्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुति करतो. 
*तो सच्चिदानन्दरूप भगवान परमात्मा अविनाशी आहे तो आमच्या ह्रदयाला सोडून कधीच राहात नाही, तो एकमेव सुखप्रदाता आहे.* या कारणास्तव नाशवंत दुःखरुप अशा संसारातुन सुटून अविनाशी सत्य व सुखस्वरुप परमात्म्याची प्राप्ती व्हावी, या प्रयोजनाच्या इच्छेने भक्तिच्या व्याख्यानास आरंभ केला जातो. अशी या कलियुगात मानवाच्या उध्दाराकरता तेच एकमेव साधन आहे. 
ज्यायोगे मानवांची भगवंताचे ठिकाणी भक्ति निर्माण होईल असा प्रचार कर. नारदांनी भक्तिदेविपुढे स्वतः अशी प्रतिज्ञा केली होती. 
मोठ्या उत्साहाने तुझी (भक्तिची) स्थापना न करीन तर मी श्रीहरीचा सेवक होऊ शकत नाही. 
 *🟣"नारदांनी विशेषरुपाने तिच्यामध्ये कोणाचेही मिश्रण नाही, अशा शुध्द भक्तिचे वर्णन केलेले आहे.*

🌺 *नारद भक्तिसुत्र* 🌺
   *भाग- 2 , सुत्र- 1*

*१७,१०,२१,रवि.s.n.b.1:52 pm. plg.*

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

+87 प्रतिक्रिया 38 कॉमेंट्स • 167 शेयर
ram kunwar saini Dec 6, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
dhruvwadhwani Dec 6, 2021

+70 प्रतिक्रिया 21 कॉमेंट्स • 24 शेयर
sachin jain Dec 6, 2021

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Mohan Patidar Dec 6, 2021

+38 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 13 शेयर
Babbu Bhai Dec 6, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB