*फक्त प्रेम करा !* सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?" सख्खा म्हणजे आपला सख्खा म्हणजे सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो त्याला आपलं म्हणावं, त्याला सख्ख म्हणावं ! ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून ! हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"* लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? *काहीच नाही.* रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, किती रोड झालीस ? कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? *नाही म्हणत.* मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ? पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ? प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच *" आपलेपणा !"* हा आपलेपणा काय असतो ? आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ भेटल्या नंतर बोलण्याची ओढ बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ निरोप घेण्या आधीच पुन्हा भेटण्याची ओढ ! ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं त्याला आपलं म्हणावं आणि चुलत, मावस असलं तरी *सख्ख म्हणावं !* मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे ..... *म्हणजे " आपलेपणा ! "* एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात तो आपला असतो , *" तो सख्खा असतो !"* लक्षात ठेवा, ज्याला दुसऱ्या साठी *"सख्ख"* होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, बाकी फक्त परिचितांची यादी असते नको असलेल्या माणसांची गर्दी असते ! तुम्हीच सांगा..... फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ? ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ? आता एक काम करा करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची झालं न धस्सकन होतयंन धडधड नको वाटतंय न यादी करायला .... रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी आणि मानायला लागा सर्वांना आपलं कोणी कितीही झिडकारलं तरी कारण ....... राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं म्हणून फक्त प्रेम करा फक्त प्रेम करा आपणास व आपल्या परीवारास दसरा उत्सवा च्या खुप खुप शुभेच्छा*

*फक्त प्रेम करा !*

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 
नेमकं काय असतं हे "सख्ख प्रकरण?" 
सख्खा म्हणजे आपला 
सख्खा म्हणजे सखा
सखा म्हणजे जवळचा
जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केंव्हाही, काहीही सांगू शकतो 
त्याला आपलं म्हणावं, त्याला सख्ख म्हणावं !

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो  
मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

ज्याच्याकडे गेल्यानंतर 
आपलं स्वागत होणारच असतं 
आपल्याला पाहून त्याला हसू
येणारच असतं
अपमानाची तर गोष्टच नसते 
फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

पंढरपूरला गेल्यावर 
विठ्ठल म्हणतो का .....
या या फार बरं झालं !

माहूर वरून रेणुका मातेचा 
किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !
मग आपण का जातो ?
कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून !
हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"*

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 
किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?
*काहीच नाही.*

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 
किती रोड झालीस ? कशी आहेस ? 
सुकलेला दिसतोस, काय झालं ? 
*नाही म्हणत.*

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?
पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?
प्रेम, माया, आपुलकी, विश्वास
म्हणजेच *" आपलेपणा !"*

हा आपलेपणा काय असतो ?

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ
भेटल्या नंतर बोलण्याची ओढ 
बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ
निरोप घेण्या आधीच पुन्हा
भेटण्याची ओढ !

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं 
त्याला आपलं म्हणावं 
आणि चुलत, मावस असलं तरी
*सख्ख म्हणावं !*

मी त्याचा आहे आणि तो माझा
आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे .....
*म्हणजे " आपलेपणा ! "*

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात 
आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात 
तो आपला असतो , 
*" तो सख्खा असतो !"*

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी *"सख्ख"* होता येतं त्यालाच कुणीतरी सख्ख असतं, 
बाकी फक्त परिचितांची यादी असते 
नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

तुम्हीच सांगा.....

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?
ज्याला तुमच्या दुख्खाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ? 

आता एक काम करा 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या
सख्ख्या नातेवाईकांची 
झालं न धस्सकन 
होतयंन धडधड 
नको वाटतंय न यादी करायला ....
रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी 
आणि मानायला लागा सर्वांना आपलं 
कोणी कितीही झिडकारलं तरी 
कारण .......
राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही 
जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं 
म्हणून फक्त प्रेम करा 
फक्त प्रेम करा आपणास व आपल्या परीवारास दसरा उत्सवा च्या खुप खुप शुभेच्छा*

+9 प्रतिक्रिया 10 कॉमेंट्स • 37 शेयर

कामेंट्स

प्रतिमा शिगवण Oct 14, 2021
तुम्हाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मला फार आवडला लेख जीवनामध्ये हेच सत्य आहे

+24 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 1 शेयर
Anil Oct 15, 2021

+65 प्रतिक्रिया 20 कॉमेंट्स • 158 शेयर

+7 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 33 शेयर
Anil Oct 15, 2021

+21 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 76 शेयर

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 23 शेयर
Chintamani Parlikar Oct 15, 2021

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 13 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Kalpana B R Oct 14, 2021

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 27 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB