_*काही माणसं सुध्दा....*_ _जीवनात काही गोष्टींना कधीच पर्याय नसतो.तसाच जीवनात आलेल्या माणसांनाही कधीच पर्याय नसतो.प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतो.पण म्हणून तो माणूस वाईट ठरवून त्याला नाकारता येत नाही.कधी -कधी वाऱ्याची छानशी थंडगार झुळूक सुंदर विंचरलेले केस विस्कटून टाकते.पण म्हणून वाऱ्याची ती झुळूक नावडती होत नाही.नदीतले दगड गोटे पाण्यात राहून गुळ-गुळीत होतात.नदी ओलांडताना त्या दगडावरून पाय घसरतो.पण म्हणून त्या दगडांना दोष देता येत नाही.समुद्रकिनाऱ्या वरून अनवाणी पायाने चालताना पायाला वाळू चिकटते.पण म्हणून वाळूला दोषी ठरवता येत नाही.वाहणाऱ्या वाऱ्याकडून त्याची मस्ती नदीतल्या दगडांपासून सावरणं आणि किनाऱ्यावरच्या वाळूपासून स्वतःचं अस्तित्व जपणं या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत.आयुष्यातील काही गोष्टी जशा आहेत तश्याच्या-तश्या स्वीकारता आल्या पाहिजेत *अगदी काही माणसं सुद्धा....*_ _*मिञांनो;काळजी घ्या.....*_

_*काही माणसं सुध्दा....*_

_जीवनात काही गोष्टींना कधीच पर्याय नसतो.तसाच जीवनात आलेल्या माणसांनाही कधीच पर्याय नसतो.प्रत्येक माणसात काही ना काही दोष असतो.पण म्हणून तो माणूस वाईट ठरवून त्याला नाकारता येत नाही.कधी -कधी वाऱ्याची छानशी थंडगार झुळूक सुंदर विंचरलेले केस विस्कटून टाकते.पण म्हणून वाऱ्याची ती झुळूक नावडती होत नाही.नदीतले दगड गोटे पाण्यात राहून गुळ-गुळीत होतात.नदी ओलांडताना त्या दगडावरून पाय घसरतो.पण म्हणून त्या दगडांना दोष देता येत नाही.समुद्रकिनाऱ्या वरून अनवाणी पायाने चालताना पायाला वाळू चिकटते.पण म्हणून वाळूला दोषी ठरवता येत नाही.वाहणाऱ्या वाऱ्याकडून त्याची मस्ती नदीतल्या दगडांपासून सावरणं आणि किनाऱ्यावरच्या वाळूपासून स्वतःचं अस्तित्व जपणं या गोष्टी शिकता आल्या पाहिजेत.आयुष्यातील काही गोष्टी जशा आहेत तश्याच्या-तश्या स्वीकारता आल्या पाहिजेत *अगदी काही माणसं सुद्धा....*_

_*मिञांनो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 25 शेयर

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 6 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर

+19 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 11 शेयर

*पूर्वजांनी केलेल्या साधनेच्या जोरावर आजची पिढी ( मुले-मुली ) हुशारीच्या आणि आर्थिक सुबत्तेच्या गप्पा मारतात आणि उपभोग घेतात, पण त्यांनी ती स्वतः कर्मे केल्याविना ती विहीर आटत चालली आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाहीये. जर सगळी अनुष्ठाने, पितृकर्मे, नित्यकर्मे, संध्या, उपासना, बंद पडली तर हळूहळू सौभाग्य देखील आटत जाईल. लौकिक विद्या तर शिकतोच आहोत. रोजची संध्या-वैश्वदेव-तर्पण वगैरे सोडा, साधी रोजची संध्याकाळची दिवेलागण आणि "शुभं करोति" देखील बहुसंख्य घरांमध्ये अदृश्य झाली आहे. त्यामुळे येणारा काळ कठीण असेल. नैसर्गिक आपत्ती, संकटे नवीन नवीन रोगांच्या रुपाने येत राहतील. वैद्यकीय शास्त्र कितीही अद्ययावत झाले तरीसुद्धा मनुष्य ह्या नैसर्गिक संकटासमोर हतबल / निष्प्रभ होईल.* *सप्रेम नमस्कार* 👏🏻🌹

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर

_*इच्छा आणि संतुष्टी....*_ _लहान बाळ जेव्हा जन्माला येते त्यावेळेस तो रडून,हसून आपल्या भावना दर्शवित असतो.आजूबाजूचे अनुकरण करून बाळ वेगवेगळ्या गोष्टी शिकत जातो.बाळामध्ये हळूहळू नवीन इच्छा जन्म घेत जातात.एक इच्छा पूर्ण झाली की नवीन इच्छेची ओढ निर्माण होते.आणि हाच माणसाचा स्वभाव बनत जातो.भौतिक जग मानवाला आकर्षित करते.या जगात राहून माणसाला दिखावटीपणाची भावना निर्माण होते.दुसऱ्याकडे जी वस्तू आहे ती आपल्याकडेही असावी अशी इच्छा निर्माण होत जाते.आणि अशा प्रकारे इच्छांची जणू लाईनच माणसाच्या जीवनात लागते.पण या इच्छाच्या डोंगरा मध्ये माणसाला संतुष्टी मात्र कुठेच मिळत नाही.आज माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याकडे हवी,असे वाटते.म्हणून एकाही गोष्टीचे सुख,आनंद न भोगता तो फक्त धावत फिरत असतो.आधी छोटेसे घर हवे म्हणून कष्ट करतो ते मिळाले की नवीन इच्छा जन्म घेते आणि त्यामागे पुन्हा धावत फिरतो.जे आपले मनापासून स्वप्न होते ते दूर सारून आता त्या स्वप्नात नव-नवीन इच्छा जन्म घेतात.आणि माणूस फक्त इच्छांच्या मागे धावत फिरतो आणि सुख समाधान गमावून बसतो.आज घर आहे तर मोठा टीव्ही हवा,गाडी पण हवी,अशा ईच्छांवर इच्छांची घरे बनत जातात.पण या घरात सावली,सुख,समाधान काही मिळत नाही.खरं तर प्रगती करणे ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे त्यावर विजय मिळविणे खूप छान गोष्ट आहे.पण जे मिळविले आहे त्याचा आनंद पूर्णपणे जगताही आला पाहिजे.आपले आई-वडील आपल्याला जन्म देतात शिकवतात चांगले संस्कार देवून मोठे करतात पण तरीही आपल्या अपेक्षा काही संपतच नाही.त्यांनी आपल्याला याच कॉलेजमध्ये टाकावे हीच गाडी घेऊन द्यावी असे आपल्याला वाटते.आपल्या इच्छा काही संपतच नाही यामुळे आपल्याला जे मिळाले आहे त्याचे महत्त्व आणि समाधान आपण घेऊ शकत नाही.याउलट त्यांनी आपल्याला काय दिले नाही हेच आपण सांगत फिरतो.मानवी मन खूप चंचल आहे त्यामुळे एका जागी स्थिर न राहता पळत असतो.एका गोष्टीची सुख मिळाल्यावर लगेच नवीन गोष्टींची इच्छा बाळगतो आणि या अशा कारणांमुळे व्यक्ती दुःखी होतो.खूप काही असतांना सुद्धा माझ्याकडे काहीच नाही असे म्हणून निराश होतो.आपल्याकडे जे आहे त्याचे सुख सोडून इतरांकडे जे आहे ते मिळण्यात दुःखी होतो.नक्कीच नवीन गोष्टी मिळविल्याच पाहिजे पण त्यात जे आपल्याकडे आहे त्याचाही आनंद मिळविला पाहिजे.म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक टप्पा आपण जगू शकू नाहीतर जेव्हा आपल्याला सगळं काही मिळेल तेव्हा ते जगण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसणार फक्त मेहनत कष्ट करीत राहिल्यावर जेव्हा ते सुख भोगण्याची वेळ येईल कदाचित तेव्हा आपल्याकडे आयुष्य नसेल म्हणून प्रत्येक क्षण जगा सगळं काही आल्यावर आनंद घेण्याची वाट पाहत बसू नका.आपल्या पुढच्या क्षणी आपल्या जीवनात काय येणार,काय होणार हे कोणालाच माहीत नसते म्हणून भविष्यात नाचण्यापेक्षा वर्तमानातच हसा नाहीतर वर्तमान आणि भविष्य दोन्ही गमावून बसाल.आनंदाची कोणतीही अशी ठराविक व्याख्या नाही आहे म्हणून आपण आपल्याप्रमाणे ते जगले पाहिजे.कोणाला पंचपकवानही कमी वाटते तर कोणी चटणी-भाकर ही सुखाने समाधानाने खातो.आज सगळ्यांकडे पैसा आहे पण समाधान मात्र कुठेही दिसत नाही.मोठी नोकरी असली तरी ही कमतरता दिसते,घर असले तरी गाडी पाहिजे याची इच्छा असते,दोन वेळेस जेवण असले तरी नवीन पदार्थाची ओढ असते.आपली माणसं आपल्या जवळ आहे तरीही आपण एकटे आहोत.सुख आपल्याजवळच असून आपण दुसरीकडे ते शोधत फिरतो याचे कारण म्हणजे आपण मिळालेल्या गोष्टींचा पूर्णपणे आनंद न घेता नवीन इच्छाकडे लगेच वळतो त्यामुळे लागोपाठ येणाऱ्या मनातील इच्छा आपल्याला समाधान मिळवून देत नाही.*आपण जेव्हा एखादे फुल तोडायला जातो तेव्हा छान फुले असतानासुद्धा त्यापेक्षाही अजून सुंदर फुलाच्या शोधात पुढे जातो पण पुढे हे माहीतच नाही की आपल्याला यापेक्षाही सुंदर फुल मिळेल की नाही.जीवन ही असेच आहे आजच्या क्षणी जो आनंद आहे तो जगा या क्षणाला सोडून यापेक्षा मोठ्या क्षणाची वाट पाहत बसू नका मग बघा प्रत्येक क्षण,आनंद आणि समाधान देणारा होईल....*_ _*मिञांनो;काळजी घ्या.....*_

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 25 शेयर

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर
Vinod from India. Dec 5, 2021

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 19 शेयर

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 9 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB