Mahaling Swami
Mahaling Swami Oct 17, 2021

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹 🌻 *आनंदी पहाट* 🌻 *सत्य ज्ञानदर्शनाची* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ *७२५ वा संत ज्ञानेश्वर महाराज* *संजीवन समाधी सोहळा* ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹 *जगात आज असे का घडतेय ? हा प्रश्न प्रत्येकच काळात अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मानवी मनाचे.. जगाचे व्यवहार सदैव असेच चालू होते आणि असेच चालणार, हे आहे.* *पण अशा परिस्थितीतही जगात मानवाने कसे जगावे.. यासाठी मानवी जीवन कल्याणाचे.. समृद्धीचे.. उत्कर्षाचे उत्तर देणारे सत्य ज्ञान केवळ भारताकडे आहे. हे ज्ञान म्हणजे गीताज्ञान. आज जगाची धाव या गीताज्ञान प्राप्तीसाठी आहे.* *कोणतेही ज्ञान कितीही चांगले असले तर, सामान्य जनांच्या भाषेत त्यांना उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नसतो. आमच्या सुदैवाने ज्ञानेश्वर माऊलींनी केवळ हे ज्ञानच उपलब्ध केले असे नाही तर आपल्या दिव्य प्रतिभेने प्रत्येक जीवाला त्या सत्य ज्ञानाने जीवनात उत्कर्षाची संधी उपलब्ध करुन दिलीय.* *महर्षी व्यास यांची प्रतिभा जगात सर्वश्रेष्ठ. पण व्यासांशी बरोबरी करणारी प्रतिभा ज्ञानोबा माऊलींना लाभल्याने गीताज्ञाना पलीकडे जात त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने भारतीयांचे जीवन उजळून निघतेय. जगातील प्रत्येक शास्त्राचा समावेश माऊलींच्या ज्ञानेश्वरीत आहे.* *ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठरवून लिहलेला नाही. ईश्वरी प्रेरणेने, गुरुकृपेने हा सामान्य जनांसाठी लिहला गेलाय. जीवनावश्यक असे अध्यात्मिक ज्ञान प्रत्येका पर्यन्त पोहोचविण्यासाठी माऊलींनी प्रारंभ केला. भागवत धर्माचा पाया रचला, म्हणूनच आज माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळयाचा आळंदीत तेवढयाच उत्साहाने.. स्वयंशिस्तीत प्रारंभ होतोय.* *संत नामदेव म्हणतात, ज्ञानदेवांच्या हृदयी असलेला प्रेमळ भाव बघता ते सर्वच योगीजनांचे माऊली आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे वेदांची बहरलेली वेल आहे. हे गीतासार म्हणजे ब्रह्मानंद लहरीच आहेत. यामुळे प्रत्येक जीवात चैतन्य दीप उजळतो. ज्ञानेश्वरीचे श्रवण केले तरी घरीच साम्राज्य उपभोगल्याचा आनंद प्राप्त होतो. या ग्रंथाची एक तरी ओवी अनुभवयलाच हवी.* *देशविदेशातील कोट्यावधी लोक भौतिक जगातील दुःख.. चिंता.. तणाव विसरुन ज्ञानेश्वरी पठन.. श्रवण.. चिंतनाचा परमानंद प्राप्त करत आहेत.* 🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹 *_ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।_* *_जेणें निगमवली प्रगट केली ॥_* *_गीता अलंकार नामें ज्ञानेश्वरी ।_* *_ब्रम्हानंद लहरी प्रगट केली ॥_* *_अध्यात्म विद्येचें दावीले ते रुप ।_* *_चैतन्याचा दीप उजळीला ॥_* *_छप्पन्न भाषेचा केलासे गौरव ।_* *_भवार्णवीं नाव उभारिली ॥_* *_श्रवणाच्या मिसें बैसावें येवोनी ।_* *_साम्राज्य भुवनी सुखें नांदा ॥_* *_नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।_* *_एक तरी ओवी अनुभवावी ॥_* 🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹 *रचना : संत नामदेव महाराज* ✍️ *स्वर : अजित कडकडे* 🎤 *🎼🎶🎼🎶🎼* 🎧 *‼जय जय रामकृष्ण हरि‼* *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹* *२७.११.२०२१* 🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB