शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आजचा दिनविशेष.१६ ऑक्टोबर १९४४. भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार व ओगलेवाडी येथील 'ओगले ग्‍लास वर्क्स'चे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म बावडा (कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे, व नंतरचे मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. ह्या संस्थेतून त्यांनी १९०८ मध्ये एल्. एम्. ई.चा शिक्षणक्रम पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला . पुढे ते बार्शीच्या 'लक्ष्मी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट' मध्ये काही काळ प्रमुख अध्यापक होते. स्वतंत्र व्यवसायातील अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी पत्करली. गुरुनाथ यांचे वडील  आत्मारामपंत ओगले यांनी २५ नोव्हेंबर १९१६ रोजी येथे लहानशा झोपडीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पहिली काच तयार केली. ती औंधच्या संग्रहालयात आजही पाहावयास मिळते. पुढे ओगलेवाडी येथील आपल्या भावाच्या काचकारखान्यात ते काम करू लागले. हिंदुस्थान सरकारने त्यांना काचउत्पादनच्या उच्च शिक्षणार्थ शिष्यवृत्ती देऊन विलायतेस पाठविले. शेफील्ड येथील अभ्यासानंतर १९२० मध्ये ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठात काचनिर्मितीच्या तंत्राचा अभ्यास करून १९२२ मध्ये ते स्वदेशी परतले. तसेच कंदीलनिर्मितीची यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ते १९२४ मध्ये जर्मनीस गेले. तेथून भारतात परतल्यावर १९२५ - २६ पासून प्रसिद्ध प्रभाकर कंदिलांचे उत्पादन त्यांनी सुरू केले. सायकली व विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथांनी आखल्या होत्या; तथापि त्या साकार होई शकल्या नाहीत. १९४२-४३ मध्ये पूर्वीचे त्रावणकोर (केरळ) व श्रीलंका येथील सरकारांशी काचकारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली; तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांनी सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील पुढे लवकरच जगद्‍‍‌विख्यात झाला. ओगलेवाडीच्या कारखान्यात विविध प्रकारचा काचमाल, एनॅमलवेअर, प्रभाकर कंदील व स्टोव्ह, विजेच्या मोटरी व पंप ह्यांचे उत्पादन होत असे. दुसऱ्या महायुद्ध काळात टाटांना काच बाटल्यांचा पुरवठा या कारखान्यातून होत होता. कंदिलाचे सारे उत्पादन सरकारने घेतले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लोकमान्य टिळकांनी या कारखान्यास भेट दिली. १९६२ मधील भारत-चीन युद्धात ओगल्यांच्या प्रभाकर कंदिलाने हिमालयाच्या कुशीत लढणाऱ्या भारतीय जवानांना मोलाची साथ करून ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे.  दुर्दैवाने १९८० मध्ये हा काच कारखाना बंद पडला. गुरुनाथांनी एडिसनचे चरित्र व अमेरिका ही दोन पुस्तके लिहिली असून किर्लोस्कर मासिकातून विविध लेखन केले. गुरुनाथ कोईमतूर येथे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी मरण पावले. काचउत्पादन क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपला ' प्रभाकर कंदील' विश्वविख्यात करणाऱ्या या महान उद्योगजकाला मन:पूर्वक अभिवादन!!!!! माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

शुभ दिन👏👏🌷🌷👏👏


आजचा दिनविशेष.१६ ऑक्टोबर १९४४. भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार व ओगलेवाडी येथील 'ओगले ग्‍लास वर्क्स'चे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचा स्मृतिदिन.

त्यांचा जन्म बावडा (कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथे, व नंतरचे मुंबईच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये झाले. ह्या संस्थेतून त्यांनी १९०८ मध्ये एल्. एम्. ई.चा शिक्षणक्रम पहिल्या क्रमांकाने पूर्ण केला . पुढे ते बार्शीच्या 'लक्ष्मी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट' मध्ये काही काळ प्रमुख अध्यापक होते. स्वतंत्र व्यवसायातील अपयशामुळे गुरुनाथांनी किर्लोस्कर बंधूंच्या कारखान्यात अभियंत्याची नोकरी पत्करली.

गुरुनाथ यांचे वडील  आत्मारामपंत ओगले यांनी २५ नोव्हेंबर १९१६ रोजी येथे लहानशा झोपडीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पहिली काच तयार केली. ती औंधच्या संग्रहालयात आजही पाहावयास मिळते.

पुढे ओगलेवाडी येथील आपल्या भावाच्या काचकारखान्यात ते काम करू लागले. हिंदुस्थान सरकारने त्यांना काचउत्पादनच्या उच्च शिक्षणार्थ शिष्यवृत्ती देऊन विलायतेस पाठविले. शेफील्ड येथील अभ्यासानंतर १९२० मध्ये ते अमेरिकेस गेले. अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठात काचनिर्मितीच्या तंत्राचा अभ्यास करून १९२२ मध्ये ते स्वदेशी परतले. तसेच कंदीलनिर्मितीची यंत्रसामग्री खरेदी करण्याकरिता ते १९२४ मध्ये जर्मनीस गेले. तेथून भारतात परतल्यावर १९२५ - २६ पासून प्रसिद्ध प्रभाकर कंदिलांचे उत्पादन त्यांनी सुरू केले.

सायकली व विजेचे पंखे यांच्या उत्पादनाच्या योजनाही गुरुनाथांनी आखल्या होत्या; तथापि त्या साकार होई शकल्या नाहीत. १९४२-४३ मध्ये
पूर्वीचे त्रावणकोर (केरळ) व श्रीलंका येथील सरकारांशी काचकारखाने सुरू करण्याबद्दल त्यांनी वाटाघाटी करून प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी केली; तथापि प्रभाकर कंदिलांची निर्मिती ही गुरुनाथांनी सर्वांत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. प्रभाकर कंदील पुढे लवकरच जगद्‍‍‌विख्यात झाला. ओगलेवाडीच्या कारखान्यात विविध प्रकारचा काचमाल, एनॅमलवेअर, प्रभाकर कंदील व स्टोव्ह, विजेच्या मोटरी व पंप ह्यांचे उत्पादन होत असे.

दुसऱ्या महायुद्ध काळात टाटांना काच बाटल्यांचा पुरवठा या कारखान्यातून होत होता. कंदिलाचे सारे उत्पादन सरकारने घेतले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लोकमान्य टिळकांनी या कारखान्यास भेट दिली. १९६२ मधील भारत-चीन युद्धात ओगल्यांच्या प्रभाकर कंदिलाने हिमालयाच्या कुशीत लढणाऱ्या भारतीय जवानांना मोलाची साथ करून ऐतिहासिक व अभिमानास्पद कामगिरी केली आहे. 

दुर्दैवाने १९८० मध्ये हा काच कारखाना बंद पडला.

गुरुनाथांनी एडिसनचे चरित्र व अमेरिका ही दोन पुस्तके लिहिली असून किर्लोस्कर मासिकातून विविध लेखन केले.

गुरुनाथ कोईमतूर येथे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी मरण पावले.

काचउत्पादन क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना राबवून आपला ' प्रभाकर कंदील' विश्वविख्यात करणाऱ्या या महान उद्योगजकाला मन:पूर्वक अभिवादन!!!!!


माहिती संकलन
सौ.संध्या यादवाडकर
माहिती स्त्रोत -- इंटरनेट.
9819993137.

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर
Mamta Chauhan Nov 30, 2021

+41 प्रतिक्रिया 20 कॉमेंट्स • 2 शेयर

+10 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 1 शेयर

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 10 शेयर
Sudha Mishra Nov 30, 2021

+3 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
parm umaVerma Nov 30, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Mr pandey ji Nov 30, 2021

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
kusum sharma Nov 30, 2021

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Meenakshi Patel Nov 30, 2021

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Mukesh Janyani Nov 30, 2021

1 कॉमेंट्स • 1 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB