*समर्थांचे साहित्यविश्व* *शहाणपणाचा अभ्यास-* 🌺 *प्रत्यये बोलता आले |* *अचूक न चुके जनी |* *सत्य मिथ्या कळो आले |* *जाणता त्यास बोलिजे ||५||* *चुकेना ठकेना कामी |* *प्रसंग जाणता बरा |* *यथातथ्य त्वरा जाणे |* *ज्याचे त्याचे परोपरी ||६||* 🌺 समर्थ रामदास म्हणतात... प्रत्येक गोष्टीचा मनापासून आणि नेमका अंदाज घ्यायचा प्रयत्न करणारा मनुष्य अनुभवशील बोलू आणि आचरण करू शकतो.त्याचे बोलणे मुद्देसूद,नेमके आणि सत्याला धरून असते.तो चुकीचे काही करणे हे बहुतेक अशक्यच असते.खरे आणि खोटे,सत्व असलेले आणि निसत्व यातला फरक लक्षात येणारा मनुष्य हुशार आणि विद्वान समजला जातो.||५|| उत्तुंग कार्य करणारा माणूस,जो शक्यतो चुकत नाही,कोणत्याही कारणाने त्याची फसगत होत नाही.येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात तो सावध असतो.सजग असतो.प्रत्येकातले सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.प्रत्येकाच्या मनातले जाणून घेऊन जो त्यांचे हित करतो तोच खरा शहाणा परोपकारी मनुष्य..!||६|| श्रीराम..! 🚩🌼🙏🙏🌼🚩

*समर्थांचे साहित्यविश्व*

*शहाणपणाचा अभ्यास-*

🌺
*प्रत्यये बोलता आले |*
*अचूक न चुके जनी |*
*सत्य मिथ्या कळो आले |*
*जाणता त्यास बोलिजे ||५||*

*चुकेना ठकेना कामी |*
*प्रसंग जाणता बरा |*
*यथातथ्य त्वरा जाणे |*
*ज्याचे त्याचे परोपरी ||६||*
🌺

समर्थ रामदास म्हणतात...

प्रत्येक गोष्टीचा मनापासून आणि नेमका अंदाज घ्यायचा प्रयत्न करणारा मनुष्य अनुभवशील बोलू आणि आचरण करू शकतो.त्याचे बोलणे मुद्देसूद,नेमके आणि सत्याला धरून असते.तो चुकीचे काही करणे हे बहुतेक अशक्यच असते.खरे आणि खोटे,सत्व असलेले आणि निसत्व यातला फरक लक्षात येणारा मनुष्य हुशार आणि विद्वान समजला जातो.||५||

उत्तुंग कार्य करणारा माणूस,जो शक्यतो चुकत नाही,कोणत्याही कारणाने त्याची फसगत होत नाही.येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात तो सावध असतो.सजग असतो.प्रत्येकातले सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतो.प्रत्येकाच्या मनातले जाणून घेऊन जो त्यांचे हित करतो तोच खरा शहाणा परोपकारी मनुष्य..!||६||

श्रीराम..!
🚩🌼🙏🙏🌼🚩

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

*समर्थांचे साहित्यविश्व* *शहाणपणाचा अभ्यास-* 🌺 *कार्य ते नेमिता येना |* *प्रसंग बहुतांपरी |* *म्हणोनि जाणता व्हावा |* *जाणजाणो वर्तावया||७||* *उणीव येऊ देना तो |* *कळहो न करी कदा |* *जनाचे मन तो राखे |* *युक्तीने काम चालवी ||८||* 🌺 समर्थ रामदास म्हणतात... कोणतेही कार्य करताना त्या कार्यात कुठे विघ्न येईल हे सांगता येत नाही.तो अंदाज बांधणे कठीण.कारण प्रसंगानुरूप कार्य आणि त्याचे परिणाम बदलत असतात.यासाठी मनुष्य पूर्ण जाणता पाहिजे.प्रत्येक बारकावे त्याला माहित पाहिजेत.म्हणजे तो योग्य निर्णय घेऊन,येणाऱ्या सर्व विघ्नावर मात करून तो कार्य पूर्णत्वास न्हेऊ शकतो.||७|| कोणत्याही कार्यात काही कमी पणा राहिला असेल तर तो भरून काढण्याकडे नेहमी शहाण्या मनुष्याचा कल असतो.आणि ते करताना कोणताही हट्टीपणा,हेकेखोरपणा तो करत नाही.प्रत्येकाला आवडेल,प्रत्येकाचे मन सांभाळून तो कार्य करत रहातो.आणि त्यासाठी शुद्ध बुद्धीचा वापर करून,युक्ती वापरून ते काम तो पूर्णत्वास न्हेतो.||८|| श्रीराम...! 🚩🙏🙏🚩

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

#🙏भक्ती स्टेट्स #🙏देवी देवता #🙏भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे #🙏स्वामी समर्थ नामस्मरणात एकाग्रता येत नाहीये ? ही पथ्ये पाळा ..यश निश्चित १) नामस्मरणासाठी निदान ३० मिनिटे दुसऱ्याचा उपसर्ग होणार नाही अशी जागा असावी. २) बाहेरची गडबड व घरातील धडपड कानावर न येणारी जागा असेल तर उत्तम. ३) सपाट जमिनीवर मऊ आसन असावे. ४) अंगावर वाऱ्याचा झोत येणारा नसावा. ५) मोठा दिवा नसावा. ६) सुगंधी उदबत्ती असावी. ७) जवळ घड्याळ असावे. ८) पवित्र स्पर्श झालेली माळ असावी. ९) दररोज उपासनेची वेळ शक्यतो तीच असावी. १०) पोट हलके व साफ असावे. ११) भूक लागलेली नसावी. तोंडात काही नसावे. ते स्वच्छ असावे. १२) डास, चिलटे, माशा यांचा उपद्रव नसावा. १३) सहजासनावर बसावे. पाठ ताठ ठेवावी. दोन गुडघ्यांवर दोन हात असावे. डोळे मिटलेले असावे. १४) दृष्टी आतमध्ये गुरुचरणांवर असावी. १५) प्रथम नाम-मंत्र गुणगुणावा म्हणजे वैखरीने म्हणावा. १६) नंतर तोंड बंद करून मनातल्या मनात म्हणावा. १७) मनातल्या मनात असतानाच मनाच्या कानाने ऐकावा. १८) हा अभ्यास दृढ झाला की श्वासोच्छ्वासामध्ये एक समत्व येते. श्वास सूक्ष्म व मंद चालतो व त्याबरोबर आत नाम चालते. १९) रोज तास अर्धा तास जरी असे नामस्मरण झाले तरी मनाला एक लक्षणीय समाधान लाभते. २०) मनाची ही समाधान वृत्ती वर्धमान होत राहणे हे प्रगतीचे चिन्ह आहे. २१) त्यासाठी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कोठेही आतमध्ये लक्ष वळवून नामाच्या नादावर गुंतून जावे. यालाच नामानुसंधान म्हणतात. २२) हे जर साधले तर सर्व व्यवहार नीट होऊन नामस्मरण अंतरी स्थिरावते. २३) सबंध शरीर नामाने भरून जाणे हे त्याचे पर्यवसान होय. २४) शरीर चालताना मी जितका चालतो, तितका भगवंत बरोबर चालतो हे जाणवते.

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 30 शेयर
Vinod from India. Nov 27, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
svsaastri Nov 27, 2021

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
svsaastri Nov 27, 2021

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते १. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते. २. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. ३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. ४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. ५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही). ६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. ७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. ८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले. ९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. १०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. ११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 8 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB