*॥ श्रीथोरलेस्वामीमहाराज ॥ खंड पहिला* *परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांचे चरित्र* *लेखक: श्री द.सा.मांजरेकर व डॉ केशव रा जोशी* *अध्याय पाचवा. अध्ययन आणि अध्यापन.* एकदा श्रीवासुदेवशास्त्री वगैरे मंडळी शेजारच्या गावी अनुष्ठान करण्यासाठी निघाली होती. डोंगराच्या पायथ्यालगत होऊन पाऊल वाट जात होती. मार्ग बराचसा खडकाळ व निर्जन होता. सर्वजण गप्पा मारीत चालले होते. श्रीवासुदेवशास्त्री मात्र खाली मान घालून निमूटपणे चालले होते. कारणाशिवाय बडबड करावयाची नाही असा त्यांचा स्वभाव होता. सकाळची वेळ होती. सूर्याचे कोवळे ऊन सुखावह वाटत होते; पण उन्हाची ऊब हळूहळू वाढत होती. त्या निर्जन रस्त्याच्या बाजूला एका शिळेच्या आडोशाला एक किरडू त्या उन्हात चमकून उठले. पिवळ्या रंगाचा तो जातिवंत नाग होता. तो दिसताच सर्व मंडळी थबकली. कोकणात नागाबद्दल लोकांच्या मनात मोठी भीती वास करते. नागाला टाळून तसेच पुढे जावयाचे धैर्य त्या मंडळींना होईना. तो नागही चमकून दबा धरून तसाच शिळेच्या आडोशाला राहिला. जो तो किंकर्तव्यमूढ होऊन गेला. तेवढ्यात प्रसंगावधान राखून श्रीवासुदेवशास्त्री पुढे झाले व पडशीतील मूठभर तांदूळ सर्पबंधन मंत्राने त्यांनी झटदिशी त्या सर्पाभोवती वर्तुळाकार पेरले. जनावर हतबुद्ध झाले व त्या अभिमंत्रित रिंगणातच पडून राहिले. आपण केलेल्या मंत्रप्रयोगाच्या प्रभावाची खात्री पटल्यावर श्रीवासुदेवशास्त्री म्हणाले, " चला, नाग आता या जागेवरून हलणार नाही किंवा डूख धरून तो आपला पाठलागही करणार नाही." लोकांनी पाहिले की, नाग काहीसुद्धा हालचाल करीत नाही, तेव्हा घाबरत, वारंवार मागे वळून पाहात सर्वजण पुढे निघून गेले. अंगिकारलेले कार्य पूर्ण करून घरी परतावयाला सर्व जणांना बराच उशीर झाला. घरी पोहोचेपर्यंत रात्र होऊ नये म्हणून मंडळी जवळच्या आड वाटेने घरी परतली. आपण एका मुक्या जनावराला मंत्रबद्ध करून जखडून ठेवले आहे याची श्रीवासुदेवशास्त्र्यांना आठवण राहिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले आन्हिक उरकीत असताना त्यांना अकस्मात आदल्या दिवशीची आठवण झाली. जवळ जवळ चोवीस तास तो नाग बंधनात पडलेला आहे या जाणिवेने श्रीवासुदेवशास्त्र्यांना फार वाईट वाटले. ते तडक उठले आणि आदल्या दिवशीच्या वाटेने जाऊ लागले. वाटेत त्यांना आदल्या दिवशीचे काही सोबती भेटले. तेही त्याच वाटेने निघाले होते. " आज एवढ्या तातडीने कोणाच्या घरी निघाला आहात !" असे त्यांनी श्रीवासुदेवशास्त्र्यांना विचारले. श्रीवासुदेवशास्त्र्यांनी चोवीस तासांपूर्वी बंधन करून ठेवलेल्या त्या नागाची त्यांना आठवण करून दिली. तो नाग अद्याप त्या रिंगणातच असेल हे कोणाला खरे वाटेना; पण श्रीवासुदेवशास्त्र्यांना खात्री होती की, तो नाग तेथेच असणार आणि अगदी तसेच झाले. कालच्या त्या ठिकाणी शिळेच्या बाजूला तो नाग मृतवत् पडला होता. त्याची ती दशा पाहून श्रीवासुदेवशास्त्र्यांना फार वाईट वाटले. त्यांनी विमोचन मंत्राचा प्रयोग करून त्या प्राण्याला बंधना पासून मुक्त केले. विमोचन प्रयोगासरशी तो नाग विजेच्या गतीने जवळच्या झाडीत पळून गेला. या प्रसंगाचा श्रीवासुदेवशास्त्र्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्यानंतर कधीसुद्धा त्यांनी सर्पबंधन मत्रांचा प्रयोग केला नाही. यावेळी श्रीवासुदेवशास्त्र्यांचे वय फार नव्हते. अजून त्यांची पौगंडावस्थाच होती. पण जे ईश्वरीतत्त्व त्यांच्या देहाच्या आश्रयाने वावरत होते, त्या तत्त्वाला वयाचे बंधन थोडेच असणार ! तरीसुद्धा त्यांच्यामधील ईश्वरीतत्त्व प्रगट व्हावयाला श्रीवासुदेवशास्त्र्यांना कठोर श्रम व तेवढीच कठोर तपश्चर्या करावी लागली. लोखंडाचे चणे खाल्याशिवाय देवकळा प्राप्त होत नाही असा जनसामान्यांचा समज आहे ना ! *॥ 🙏श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय🙏 ॥* *॥ 🌹🌹🌹 श्रीगुरुदेव दत्त 🌹🌹🌹 ॥* *१६,१०,२१,शनि.s.n.b.6:26 pm. plg.*

*॥ श्रीथोरलेस्वामीमहाराज ॥ खंड पहिला*
*परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांचे चरित्र*
*लेखक: श्री द.सा.मांजरेकर व डॉ केशव रा जोशी*
*अध्याय पाचवा. अध्ययन आणि अध्यापन.*

एकदा श्रीवासुदेवशास्त्री वगैरे मंडळी शेजारच्या गावी अनुष्ठान करण्यासाठी निघाली होती. डोंगराच्या पायथ्यालगत होऊन पाऊल वाट जात होती. मार्ग बराचसा खडकाळ व निर्जन होता. सर्वजण गप्पा मारीत चालले होते. श्रीवासुदेवशास्त्री मात्र खाली मान घालून निमूटपणे चालले होते. कारणाशिवाय बडबड करावयाची नाही असा त्यांचा स्वभाव होता. सकाळची वेळ होती. सूर्याचे कोवळे ऊन सुखावह वाटत होते; पण उन्हाची ऊब हळूहळू वाढत होती. त्या निर्जन रस्त्याच्या बाजूला एका शिळेच्या आडोशाला एक किरडू त्या उन्हात चमकून उठले. पिवळ्या रंगाचा तो जातिवंत नाग होता. तो दिसताच सर्व मंडळी थबकली. कोकणात नागाबद्दल लोकांच्या मनात मोठी भीती वास करते. नागाला टाळून तसेच पुढे जावयाचे धैर्य त्या मंडळींना होईना. तो नागही चमकून दबा धरून तसाच शिळेच्या आडोशाला राहिला. जो तो किंकर्तव्यमूढ होऊन गेला. तेवढ्यात प्रसंगावधान राखून श्रीवासुदेवशास्त्री पुढे झाले व पडशीतील मूठभर तांदूळ सर्पबंधन मंत्राने त्यांनी झटदिशी त्या सर्पाभोवती वर्तुळाकार पेरले. जनावर हतबुद्ध झाले व त्या अभिमंत्रित रिंगणातच पडून राहिले. आपण केलेल्या मंत्रप्रयोगाच्या प्रभावाची खात्री पटल्यावर श्रीवासुदेवशास्त्री म्हणाले, " चला, नाग आता या जागेवरून हलणार नाही किंवा डूख धरून तो आपला पाठलागही करणार नाही." लोकांनी पाहिले की,  नाग काहीसुद्धा हालचाल करीत नाही, तेव्हा घाबरत, वारंवार मागे वळून पाहात सर्वजण पुढे निघून गेले. 

अंगिकारलेले कार्य पूर्ण करून घरी परतावयाला सर्व जणांना बराच उशीर झाला. घरी पोहोचेपर्यंत रात्र होऊ नये म्हणून मंडळी जवळच्या आड वाटेने घरी परतली. आपण एका मुक्या जनावराला मंत्रबद्ध करून जखडून ठेवले आहे याची श्रीवासुदेवशास्त्र्यांना आठवण राहिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले आन्हिक उरकीत असताना त्यांना अकस्मात आदल्या दिवशीची आठवण झाली. जवळ जवळ चोवीस तास तो नाग बंधनात पडलेला आहे या जाणिवेने श्रीवासुदेवशास्त्र्यांना फार वाईट वाटले. ते तडक उठले आणि आदल्या दिवशीच्या वाटेने जाऊ लागले. वाटेत त्यांना आदल्या दिवशीचे काही सोबती भेटले. तेही त्याच वाटेने निघाले होते. " आज एवढ्या तातडीने कोणाच्या घरी निघाला आहात !" असे त्यांनी श्रीवासुदेवशास्त्र्यांना विचारले. श्रीवासुदेवशास्त्र्यांनी चोवीस तासांपूर्वी बंधन करून ठेवलेल्या त्या नागाची त्यांना आठवण करून दिली. तो नाग अद्याप त्या रिंगणातच असेल हे कोणाला खरे वाटेना; पण श्रीवासुदेवशास्त्र्यांना खात्री होती की, तो नाग तेथेच असणार आणि अगदी तसेच झाले. कालच्या त्या ठिकाणी शिळेच्या बाजूला तो नाग मृतवत् पडला होता. त्याची ती दशा पाहून श्रीवासुदेवशास्त्र्यांना फार वाईट वाटले. त्यांनी विमोचन मंत्राचा प्रयोग करून त्या प्राण्याला बंधना पासून मुक्त केले. विमोचन प्रयोगासरशी तो नाग विजेच्या गतीने जवळच्या झाडीत पळून गेला. या प्रसंगाचा श्रीवासुदेवशास्त्र्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, त्यानंतर कधीसुद्धा त्यांनी सर्पबंधन मत्रांचा प्रयोग केला नाही. यावेळी श्रीवासुदेवशास्त्र्यांचे वय फार नव्हते. अजून त्यांची पौगंडावस्थाच होती. पण जे ईश्वरीतत्त्व त्यांच्या देहाच्या आश्रयाने वावरत होते, त्या तत्त्वाला वयाचे बंधन थोडेच असणार ! तरीसुद्धा त्यांच्यामधील ईश्वरीतत्त्व प्रगट व्हावयाला श्रीवासुदेवशास्त्र्यांना कठोर श्रम व तेवढीच कठोर तपश्चर्या करावी लागली. लोखंडाचे चणे खाल्याशिवाय देवकळा प्राप्त होत नाही असा जनसामान्यांचा समज आहे ना ! 

*॥ 🙏श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय🙏 ॥*
*॥ 🌹🌹🌹 श्रीगुरुदेव दत्त 🌹🌹🌹 ॥*
*१६,१०,२१,शनि.s.n.b.6:26 pm. plg.*

+11 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर
Sudha Mishra Dec 6, 2021

+9 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Rakesh.Kr Dec 6, 2021

+6 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 0 शेयर

+128 प्रतिक्रिया 53 कॉमेंट्स • 219 शेयर

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Pooja Rajpoot Dec 6, 2021

+15 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर
Rakesh.Kr Dec 6, 2021

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
pradeep rajpurohit Dec 6, 2021

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
Rakesh.Kr Dec 6, 2021

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
manojshekhar Dec 6, 2021

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB