*🌹🙏 जय हरी विठ्ठल🙏🌹* *चारी वेद जयासाठी!* *त्याचे नाम धरा कंठी!!* *न करी आणिक साधन!* *कष्टसी का वयांविण!!* *अठरा पुराणांचे पोटी!* *नामाविण नाही गोठी!!* *गीता जेणे उपदेशिली!* *तेही विटे- वरी माऊली!!* *तुका म्हणे सार धरी!* *वाचे हरिनाम उच्चारी!!* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *चार वेद ज्याचे वर्णन करतात त्या श्रीहरीचे प्रेमस्वरूप नाम कंठात धारण कर.* *नाम हे सोपे साधन आहे. नामासारखे सोपे साधन सोडून इतर अवघड साधना करून, कष्ट का बरे करून घेतोस?* *अठरापुराणांच्या मध्ये नामावाचून दुसरी महत्वाची गोष्ट दिसत नाही.* *ज्या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा अनमोल उपदेश केला, तोच श्रीकृष्ण पंढरपुरात विठ्ठल माऊलीच्या रुपात विटेवर उभा आहे.* *तुकाराम महाराज म्हणतात,यासाठी साररूप असे जे श्रीहरीचे मंगलमय,कल्याणकारी नाम तू वाचेने उच्चारित जा.* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 24 शेयर

*।।नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।।* जगद़्गुरू संत तुकाराम महाराज ************************* *नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।।१।।* *न लगती सायास जावे वनांतरा । सुखी येतो घरा नारायण ।।२।।* *ठायीची बैसोनि करा एकृचित्त । आवडी अनंत आळवावा ।।३।।* *रामकृष्णहरि विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ।।४।।* *याविण आणीक असता साधन । वाहातसे आण विठोबाची ।।५।।* *तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुंनि । शहाणा तो धणी येतो येथे ।।६।।* ************************* *भावार्थ : ---* मंबाजी आणि सालोमालोच्या प्रकरणामुळे तुकोबांची ख्याती आणखी वाढली. आधीच ते प्रामाणिक वृत्तीचे व चिरंतन सत्याची कास धरणारे होते. सतत भगवंताचे नाम स्मरण, चिंतन करीत असताना देहभान विसरून जात असे. नामस्मरण करता करता त्यांच्या मुखामधून वरील अभंग प्रकट झाला. ते म्हणतात, नामस्मरण व नामाचे चिंतन हे परमार्थातील एक अत्यंत सोपे साधन असल्याने त्यामुळे अनंत जन्माचे पाप नष्ट होते. हे नामसंकीर्तन करायला वनात जावे लागत नाही. आपण ज्या ठीकाणी असाल तेथेच एकचित्ताने भगवंताचे नामचिंतन करा. भक्तवत्सल नारायण साक्षात साधकाजवळ येतो. त्यासाठी साधकाने फक्त "रामकृष्णहरि विठ्ठल केशवा " हा मंत्राचा सतत जप करावा. मी खरे सांगतो की, भगवंत प्राप्तीसाठी यापेक्षा दुसरे कोणतेही सोपे साधन नाही " असे संत तुकाराम महाराज सांगतात. 🌼🌹🙏🙏🌹🌼

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर
Vinod from India. Nov 27, 2021

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

*🌹🙏जय हरी विठ्ठल🙏🌹* *मनवाचातीत तुझे हे स्वरूप!* *म्हणोनिया माप भक्ती केले!!* *भक्तीचीया मापे मोजितो अनंता!* *इतराने तत्वता न मोजवे!!* *योग याग तपे देहाचीया योगे!* *ज्ञानाचीया लागे न सांपडसी!!* *तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा!* *घ्यावी जी केशवा करितो ऐसी!!* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल🙏🌹* *देवा! तुझे रूप, मन,वाणी यांनी आकलन न होण्यासारखे आहे. या दोन्हीच्या पलीकडे तू आहेस; म्हणून भक्तिच्या आधारे तुला आम्ही जाणण्याचा प्रयत्न करीत आहोत.* *अनंता, तुला भक्तीच्या मापाने जाणता येईल. इतर साधनांनी तुझे खरे रूप समजणे अतिशय अवघड आहे.* *योग, यज्ञ, याग तप वगैरे देहाच्या अनेक कठोर साधना आणि अफाट ज्ञानाच्या आधारे तुझे रूप कधी समजू शकणार नाही.* *तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुला शरण आलो आहे. आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या भक्तांची सेवा तू प्रेमाने स्वीकारावी.* *🌹🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर

:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------::::::-----:::: ::- अभंग क्र.८२४ -:: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- साधना करण्याविषयी उपदेश देत आहेत. मेल्यानंतर अग्निने देह जळतो हे खरे. पण जिवंतपणी नुसता देहच नव्हे तर मन आणि बुद्धीसुद्धा त्रिविध तापाने तप्त होतात. ह्या संसारात संचित, क्रियमाण, व प्रारब्ध ही चुकत नाहीत. रहाटाच्या माळेत मडकी फिरत असतात. त्यात एक भरत असते, एक रिकामे होत असते. प्रपंचाचे असेच आहे. म्हणून साधका, हा प्रपंचरूपी पंचाग्नी तू साध्य करून घे. म्हणजे तुला आत्मशांती प्राप्त होईल.।।१।। **************************** जिव्हेने नित्य नारायणाचे नाम घेत राहा. त्याने जन्म, जरा, व्याधी, पाप ही सगळी दु:खे नाश पावतील.।।२।। **************************** तू वनातील गुहेत गेलास, शीतोष्ण सहन केलेस, आसनापासून समाधीपर्यंत योगसाधना केलीस, तप, तीर्थ, दान, व्रत, यज्ञ काही केलेस तरी भोग कधीही चुकणार नाहीत. तेव्हा जन्म, जरा, शारीरिक दुःख आणि व्याधी तू सहन कर आणि काम, क्रोध, अहंकार यांच्या ऊर्मी सहन करून अविनाशी आत्मसुख आपल्या ठिकाणी साध्य करून घे.।।३।। **************************** वेदपठण करण्यात अहंकार व विधिनिषेध मागे लागतात, आणि शास्त्रविषयक वाद करण्यात निंदा इत्यादि दोष पक्के होतात. म्हणून ही भूषणे दूषणांचीच मुळ आहेत. त्यांची हाव धरू नकोस. संतांना सर्वभावे शरण जा. आणि ज्या स्थितीत सहजतेने राहता येईल, त्या स्थितीत राहा.।।४।। **************************** आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२७/११/२०२१ वार-शनिवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- रामकृष्णहरी -::::::::::::::::

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

खचित तुम्ही सांगा | कोण्या रंगाची आहे ती मुरली |धृ| किती लांबीची, किती रुंदीची, किती उंचीची आहे ती मुरली |१| किती रंगाची, किती भिंगाची, किती युगाची आहे ती मुरली |२| किती घराची, किती सुराची, किती फेर्‍याची आहे ती मुरली|३| ज्ञानदेव म्हणे, गुरुकृपेने ओळखुनी घ्यावी ती मुरली |४| या अभंगात मुरली या शब्दानं व्यक्त होणारा "फूंकवाद्य"किंवा "सुषिर वाद्य"असाच अर्थ गृहीत धरायला हवा असं नाही!भौतिक वाद्याचं वय रंग रूप उंची खोली जाडी इत्यादि प्रकारे वर्णन करता येतं! इथं ज्ञानेश्वरमाउलींना मुरली या शब्दातून त्याच्या लक्षणाशक्तीतून प्रतीत होणार्‍या लक्ष्यार्थानं..मुरलीतून निघणारा ध्वनि म्हणजे..."भगवंताचा..परब्रह्म परमात्म्याचा जो अनाहत नाद..शब्द सर्व ब्रह्मांडात भरून राहिलाय.. तो"असा अर्थ अभिप्रेत असावा असं वाटतं!आणि त्याही पुढे जाऊन मुरली बनवणारा..निर्माता,ती वाजवणारा वादक आणि त्यातून निघणार्‍या संगीताचा आस्वाद घेणारा..भोक्ता..असा शब्दाच्या व्यंजनाशक्तीतून निघणार्‍या व्यंग्यार्थानं घेतला जाऊ शकणारा अर्थ अभिप्रेत असावा असंही वाटतं!! त्या अनाहत नादाला..शब्दाला वय रंग रूप जाडी उंची खोली इत्यादि काहीही नसून "केवळ असणं"इतकंच आहे..तो अवर्ण्य,अनिवेद्य,असून केवळ स्वसंवेद्य आहे..कारण त्या नादाचा निर्माताही तत्स्वरूपच आहे..तसाच आहे! माउलींनी अशाच एका अभंगात भगवंतालाच तुज सगुण म्हणू की निर्गुण रे असं विचारलंय आणि शेवटी सद्गुरु श्रीनिवृत्ति- नाथांच्या कृपाप्रसादानं तो गोविंदच..परब्रह्मपरमात्माच.. सगुणनिर्गुण,साकारनिराकार,स्थूळसूक्ष्म,दृश्यादृश्य इत्यादि उभयविध असल्याचं आपल्याला सांगता आल्याचं म्हणतात! या अभंगातून भगवंताच्या स्वरूपाविषयी जाणण्याची इच्छा..प्रेरणा ज्ञानेश्वर असलेल्या त्यांना चित्कला मुक्ताबाईंनी त्यांना अभंगातूनच विचारलेल्या स्वानुभवाधारित प्रामाणिक जिज्ञासायुक्त प्रश्नातून झाली असावी.त्या अभंगात मुक्ताई विचारतात... विटेवरी मूर्त दिसते सगुण,सगुण की निर्गुण म्हणू दादा? सगुण जरी म्हणू,दिसते निर्गुण,वाचेचे भिन्न पडले दादा।। वचन बुडाले,स्तब्ध झाले मन,सगुणनिर्गुण दोन्ही नाही।। म्हणे मुक्ताबाई,सांग ज्ञानदेवा,विचार हा बरवा करोनिया।। मुक्ताबाईंच्या या अभंगातील प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जसं त्यांनी भगवंतालाच विचारलं की तुज सगुण म्हणू की निर्गुण रे?आणि शेवटी सद्गुरु निवृत्तिनाथांच्या कृपेचा हवाला देत प्रत्येक चरणाच्या अखेरी जरी म्हणाले की ते सर्व..असं वा तसं तूच आहेस..तरी तुम्हा आम्हा भक्तांच्या अंतःकरणात भगवत्स्वरूपाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून एका रूपकाद्वारे..मुरलीच्या माध्यमातून ते प्रश्न करतात व त्याच्या एका निश्चित..ठाम अशा योग्य उत्तराची अपेक्षा करतात. ज्ञानेश्वरमाउली जरी मुरलीचं विविधांगांनी रूपवर्णन विचारत असले तरी शेवटी आलेल्या गुरूंच्या उल्लेखामुळे ती मुरली सामान्य..लौकिक..भौतिक..प्रापंचिक...ऐहिक नसून असामान्य,अलौकिक,आध्यात्मिक,पारमार्थिक,पारलौकिक अशीच असावी असं त्यांना अपेक्षित असावंसं वाटतं! भगवान श्रीकृष्णांच्या हातातली मुरली हे एरव्ही वाटतं तसं सामान्य फुंकणीसारखं वाद्य नव्हे!वस्तुतः तुम्हीआम्ही..नव्हेनव्हे सर्वच चराचर ब्रह्मांडातला अणुरेणूही मुरली म्हणून गृहीत धरला तरी कुणातून कोणतं संगीत कशा तालासुरातून प्रसृत करायचं व ते कोणाला केव्हा किति काळ कशासाठी ऐकवायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य अधिकार त्याच्याच कडे आहे! पण सामान्यतः लोकांमधून उठणारे..सुखदुःखांचे,आनंदाचे कर्णमधुर वाटणारे,तर कधी हताशेचे,वैफल्याचे, द्वेषवैरईर्ष्यादिकांचे कर्णकर्कश्य स्वर ऐकायला मिळाले की भगवंताच्या या मुरलीबद्दल कुतूहल जागं होतं व विचारांसाठी प्रवृत्ति निर्माण होते. ही मुरली म्हणजे तुम्ही आम्ही माणसंच आहोत,पशुपक्ष्यादि मानवेतर सृष्टीच आहे असं गृहीत धरलं तर व्यक्ति तितक्या प्रकृति या न्यायानं वय रंग रूप आकार उंची खोली जाडी ध्वनि या प्रत्येक बाबतीत किति विविधता पहायला मिळते!इतक्या सर्व मुरल्यांचा निर्माता-नियंता..चालक-मालक..वादक कोण कसा कुठे असेल..असतो..असाही प्रश्न उभा राहतो.यातली एखादीच मुरली भगवंत आपल्या हाती घेतो..आपल्या ओठांवर ठेवतो..त्यातून त्याला हवे तेच.. आवडतील तेच सूर स्वतःच्या आनंदासाठी काढतो!तेव्हा आपल्याकडे त्या महान वादकाचं लक्ष जावं असं ज्या मुरलीला वाटेल तिनं त्यासाठी स्वतःची शुद्धि करायला हवी! मुरलीला बाँसुरी असंही म्हणतात..बाँसुरी शब्द वंश..बाँस यापासून निघालाय..बास म्हणजे वेळू!त्याला वेळूवनातून सुटं होऊन..मुळं तोडून घेऊन..आतल्या गाठी फोडून.. साफ करून..पूर्णपणे पोकळ,मोकळा स्वच्छ करावा लागतो..त्याला बाहेरून तासून मग छिद्रं पाडावी लागतात..मग जेव्हा एका बाजूनं फुंकावा तेव्हा त्यातून नाद निघतो..विशिष्ट सूर निघायला प्रमाणातच हवा फुंकून ठराविक छिद्रंच मोकळी वा बंद ठेवावी लागतात! माणसाला आपल्या देहाची बासरी..मुरली भगवंतानं हाती घेऊन..स्वतःच्या ओठांच्या उशीवर प्रेमानं ठेवून.. चांगले सूर त्यातून काढावेत असंं वाटत असेल तर स्वतःला सर्व कुटुंबपरिवार ,आप्तगोप्त, मित्रपरिचित यांच्याविषयीची आसक्ति सोडून वेगळं काढावं लागेल..स्वदेहाला आसनप्राणायामादींनी.. योगादिक क्रियांनी स्वच्छ शुद्ध ठेवावं लागेल..कामक्रोधादि षड्रिपूंना विविध व्रतवैकल्यं,यमनियमादिकांनी नष्ट करावं लागेल..सदसद्विवेकानं मन-बुद्धि-विचार-भावना यांना भगवंताविषयी आत्यंतिक प्रेमाची गोडी लावून डोळ्यांच्या भिंगांना त्याचंच सतत सगुण रूप बघायची संवय लावावी लागेल..मुखानं भगवन्नामजपाची,भगवन्नामसंकीर्तनाची, भगवद्गुण-रूप-लीलासंकीर्तनाची अखंड आवड लावावी लागेल.."तद्विस्मरणे परम व्याकुलता"वाटावी इतकी हातापायादिक सर्व कर्मेंद्रियांच्या द्वारे होणारे यच्चयावत सर्व जीवनव्यापार अखिल आचार,आहार,विहार,संचार भगवंतालाच अर्पण करण्याची मनाला संवय लावावी लागेल..हे सर्व मुरली-बासरी तयार करणार्‍या कुशल कारागिराच्या हातूनच व्हायला हवं आणि ही मुरली-बासरी जाणकार वादकाच्या हातीच जायला हवी..म्हणजेच सद्गुरुच्याच हाती हे वाद्य पडायला हवं..असं झालं तरच सद्गुरूनं पारखून दिलेली ही आपल्या देहाची मुरली-बासरी भगवंत स्वतःच्या हाती धरून अनादिअनंत युगापासून चालू असलेलं हे त्याच्या आवडीचं विश्वसंगीत वाजवेल.. शास्त्रीय संगीतात जरी सातच सूर असले तरी त्यांच्यातील तीव्रकोमल या विकारातून आणि त्यांच्या विशिष्ट अनुक्रमबद्धतेतून आणि वर्ज्यअवर्ज्यादि नियमबद्धतेतून आरोहअवरोहादिक क्रियातून जशा विविध रागरागिण्या,विविध तालांच्या..कालाच्या विविध परिमाणातून तयार होतात..आलाप-तानादिमुळे चमत्कृतियुक्तता त्या संगीतात येऊन कर्णमधुरतेबरोबरच कधी प्रसन्नता,कधि विकलता,कधि अचंभितता अनुभवायला मिळते... तशीच विविध देहांच्या या मुरलीतून भगवंत परस्पर आघातातून,संवादविसंवाद, अनुवादपरिवाद निर्माण करून त्याला हवं तेच संगीत आत्मविनोदनार्थ..स्वतःच्या विरंगुळ्यासाठी वाजवतो..त्या संगीताची अनंत घरं..घराणी तो बनवतो..अनेक युगांपासून या असंख्य,अगणित मुरलींना तो हाताळतोय..या मुरलींंना अनेक हातातून तो फिरवतोय..त्यांचं रंगरूपआकार बदलवीत तो सजवतोय..स्वरांचे अनेक फेरे,त्यांची अनेक आवर्तनं घडवतोय,मुरलींकडे बघण्यासाठी अनेकांची अनेक प्रकारची भिंगं तो बनवतोय.. हे सर्व केवळ एका सद्गुरूलाच समर्पित होऊन कळू शकेल आणि आपल्या देहाच्या बासरी..मुरलीतून त्यानं सतत आणि आपल्या लयापर्यंत शाश्वत,सुरेल,सर्वजनप्रिय असं संगीत वाजवावं यासाठी सद्गुरूंची अखंड,अविरत,अव्याहत सेवा,भक्ति करावी लागेल. ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरुकृपेनं आपण आपल्या देहाची ही मुरली ओळखून घ्यावी..या जन्मातला बराचसा काळ जरी संपला,सरला असला तरी उर्वरित काळात सद्गुरूचा ध्यास लागावा,आपल्याला अंतिम क्षणीही आस अशीच लागावी की या पुढील जन्मातल्या आपल्या देहातून तरी भगवंताला आवडेल अशीच मुरली उत्तम वंशातून व सद्गुरूंच्या हातून घडावी, आणि सद्गुरुकृपेनं ती भगवंताच्या हाती पडून त्याच्या सदैव स्मितहास्य दाखवणार्‍या अधरांवर ती विसावावी आणि त्याच्या इच्छेनं,आवडीनं,प्रेमानं सुमधुर अवीट असं विश्वसंगीत..तो अनाहत नाद या मुरलीतून बाहेर पडावा..ब्रह्मांडात सर्वत्र पसरावा आणि त्याची मोहिनी आपल्यासह सर्वांना..कृमिकीटकांपासून व्याघ्रसिंहादिकांना..चराचराला वाटून निसर्गसिद्ध परस्पर वैर सरावं व भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे ही माऊलींनी पसायदानात व्यक्त केलेली प्रार्थना..मागणी प्रत्यक्षात उतरो! *श्रीराम जयराम जयजय राम!* * नमो भगवते वासुदेवाय!* *जय जय रामकृष्णहरि!* 🙏🏻🙏🏻

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

:::::-----::::::-----:::::-----::::: ।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।। :::::----::::::------::::::-----:::: ::- अभंग क्र.८२२ -:: **************************** या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात- "ज्या वचनाच्या योगाने भगवंत अंतरेल, ते वचन गुरूचे जरी असेल, तरी मानू नये. बळी राजा वामनाच्या हातावर झारीने दानाचे पाणी घालणार तेवढ्यात शुक्राचार्य सूक्ष्मरूपाने त्याच्या झारीच्या तोटीत जाऊन बसले. कारण विष्णूला दान देण्यास त्यांचा विरोध होता. पण बळीने तोटीत दर्भ घातला तेव्हा शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला.।।१।। **************************** देवाने मनात आणल्यावर काय होणार नाही? सर्व गोष्टी शक्य होतात. असे असता, भगवंताला सोडून इतर साधनांचे श्रम का करता?।।२।। **************************** आपल्या भ्रतारांची आज्ञा मोडून ऋषींच्या स्त्रिया अन्न घेऊन कृष्णाकडे गेल्या. त्यांचा धर्म आणि त्यांची लाज यांचे कृष्णाने रक्षण केले.।।३।। **************************** प्रल्हादाने आपला पिता हिरण्यकश्यप ह्याने वैर धरले तेव्हा त्याला भगवंताकडून मारविले. पित्याने भजनात पुष्कळ विघ्ने केली, पण प्रल्हादाने आपला निर्धार सोडला नाही.।।४।। **************************** गवळणींनी देवाशी व्यभिचार केला, व स्वतः चा आचारधर्म सांडून त्या भगवंताशी रत झाल्या. पण त्यांना भगवंताने जे दिले, ते इतर कोणासही दिले नाही. त्याने गवळणींना अंतर्बाह्य ऐक्य दिले.।।५।। **************************** म्हणून देवाचा लाभ होण्यात अधर्म होत असला, लौकिकात गृहणीय कर्म झाले असे वाटले तरी देवाची प्राप्ती होत असेल , तर ते करावे. पण देव अंतरेल असे काहीही कर्म करू नये. भगवान हा भक्ताच्या हदयातील कळवळा जाणतो, म्हणूनच पातकी अशा अजामिळाचा त्याने उद्धार केला."।।६।। **************************** आपला दास:- ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे आळंदी देवाची दि.२५/११/२०२१ वार-गुरुवार :::::---::::::------:::::::-----::::: ::::::::::- रामकृष्णहरी -::::::::::::::::

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB