🌹🌹 *नारद भक्तिसुत्र* 🌹🌹 *सुत्र- 1* *भाग- 1* *अथातो भक्तिं व्याख्यास्यामः! !! 1 !!* सर्व वाचकांना विनम्र सुचना आहे. आजपासून दररोज नारद भक्तिसुत्रावर लेख देणार आहोत तरी सर्व वाचकांनी याचा आनंद घ्यावा. भक्तिसुत्राचा विचार केला तर भगवान व्यासांनी सुत्राची निर्मिती केलेली आहे. व्यासनिर्मित पाचशे पंचावन्न सूत्र आहे. गर्गाचार्यांनी सुत्राची निर्मिती केलेली आहे व शांडिल्य मुनींनी सुध्दा भक्तिसुत्राचे लिखाण केलेले आहे परंतु कालपरत्वे काहि महात्म्यांची सुत्रे लोप पावली आहेत. नारदजींनी जे सुत्र लिहिले आहेत ते देवर्षी नारद यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत भक्ति कशी असावि हे जर समजुन घ्यायचे असेल तर नारदभक्तिसुञ हे आचरणात उतरविले पाहिजे, कारण भक्तीचे ऊच्च कोटीतील जाणकार अनुभवी नारदापेक्षा दुसरे कुणीच सापडणार नाहीत. जे रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करत होते *नारायण नारायण! पारायण हे करी!!* हि अवस्था नारदजींची होती. सुत्रांचा आरंभ करत असताना नारदजींनी *अथातो भक्तिं व्याख्यास्यामः!* या सुत्राने आरंभ केलेला आहे. परंतु नियम असा आहे कि कुठलेही कार्य करत असताना किंवा कोणताही ग्रंथारंभ करताना मंगलाचरण हे करायलाच पाहिजे. शास्त्रात मंगलाचरणाचे तीन प्रकार आहेत; आशिर्वादरुप मंगलाचरण, नमस्काररुप मंगलाचरण आणि वस्तुनिर्देशरुप मंगलाचरण या वस्तुनिर्देशरुप मंगलाचरणाचे दोन प्रकार आहेत. सगुणवस्तुनिर्देशरुप मंगलाचरण आणि निर्गुणवस्तुनिर्देशरुप मंगलाचरण. परंतु नारदजींनी भक्तिसुत्राची सुरुवात करताना *"अथ भक्तिं व्याख्यास्यामः!* या सुत्राने केली आहे. या सुत्राचा अर्थ "अथ- (आता) अतः (म्हणून) , भक्तिं- भक्तिचे; व्याख्यास्यामः- आम्हि व्याख्यान करत आहोत. या सुत्राचा आरंभ "अथ " या शब्दाने केला, हा शब्द मंगलाचरणात येत नाहि परंतु मंगलवाचक आहे. त्याचे कारण पुढील श्लोकात आहे. *ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रम्हणः पुरा!* *कंठं भित्त्वा विनिर्यायातौ तेन माङ्गलिकावुभौ!!* सृष्टिच्या आरंभी भगवंताच्या नाभीकमलापासुन उत्पन्न झालेल्या ब्रम्हदेवाच्या कंठातुन प्रथम 'ॐ' आणि 'अथ' हे दोन शब्द निर्माण झाले म्हणून ते दोन्ही मंगलवाचक मानले गेले. अथ शब्दाचा अर्थ कोशात मंगल असा नाही , पण अथ शब्दाचा उच्चार होताच मंगलवाद्य ध्वनिश्रवणाप्रमाणे मंगलभाव प्रगट होतो. म्हणून अनेक दर्शनांची जी सुत्रे आहेत त्यांचा आरंभ "अथ "या शब्दाने झालेला आहे. "अथातो ब्रम्हजिज्ञासा " , अथातो धर्मजिज्ञासा, अथातो धर्म व्याख्यास्यामः , अथ योगानुशासनम्, इत्यादि परंतु देवर्षी नारदांसारखे व्याख्यान करणारे आणि भक्तिसुत्रासारखा विषय, या सुत्रात अमंगल काहि राहाणारच नाहि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अथ शब्दाचे आरंभ, अधिकार व अनंतर हे तीन अर्थ आहेत. अधिकार असा अर्थ घेतला तर इतर साधनांना जसा पूर्वी साधनाचरण होऊन अधिकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ धर्माचरण करणाऱ्याला वेदाध्ययनाने अधिकार प्राप्त होतो . ज्ञानाचा अधिकार विवेक- वैराग्यदि अंतरंग साधनाचरणाने प्राप्त होतो. योगसमाधिचा अधिकार यमनियमादिकांनी सिध्द होतो, तसे भक्ति हे साधन करण्यापुर्वी इतर कोणत्याहि साधनाची ती अपेक्षा ठेवीत नाही. विहित कर्मे करण्यास त्रैवर्णिक अधिकारी आहे. यज्ञयागादि करण्यास ग्रहस्थाश्रमी अधिकृत आहे. तसा येथे वर्णआश्रम, जाति अवस्था, वय इत्यादी कोणतीही अधिकार लागत नाही. मनुष्य देहात आला तो भक्तिचा अधिकारी होतो एखादा भक्ति करत नसेल तर तो पुरुषापराध होय. पण तो अधिकारी नसतो असे नाही . म्हणून "अथ" पदाचा अर्थ अधिकार असे घेता येत नाही. तसेच अनंतर हाही अर्थ उपयुक्त नाही. काहि साधने प्रथमतः इतर साधनाचरण करुनच केलि जातात. तसे भक्तिचे नाही . पुढे नारदांनी भक्ति स्वयंफलरुप आहे असे म्हटले आहे. तप, यज्ञक्रिया इत्यादी साधनांची भगवद्भक्तिपुर्वी अपेक्षा असते असे नाहि. कारण तप, यज्ञक्रियादिकांची पुर्तता नामस्मरणपूर्विका भक्तीनेच होते. हे पुराणादिकांतुन प्रसिद्ध आहे. सर्वसाधननिरपेक्ष भक्ति आहे. श्रीनारदमहर्षींनी अनेक ग्रंथ, स्मृति, पांचरात्र इ. निर्माण केले, पण त्यांच्याद्वारे सर्व मानवांचा उध्दार होईल असे नाही. कारण त्यात केलेला विचार सुक्ष्म व गुढ आहेव सांगितलेले साधने क्लिष्ट अशी आहेत. म्हणून वरील ग्रंथनिर्मिती नंतर सर्वजनसुलभ अशा भक्तियोगाचे रहस्य सर्वांना पटवून द्यावे, या हेतुने सुत्रांची रचना केलि. असा अर्थ होऊ शकेल. "अथ" शब्दाचा आरंभ असाही अर्थ घेणे योग्य होईल. कारण श्रीनारद महर्षी या सुत्रात आम्हि आता भक्तिचे व्याख्यान करतो अशी प्रतिज्ञा करतात. हे प्रतिज्ञा सुत्र म्हटले जाते. योग्य व श्रेष्ठ व्यक्तींनी केलेली प्रतिज्ञा प्रयोजन सिद्ध करणारी असते. ते प्रयोजन पुढील चौथ्या- पाचच्या सुत्रातुन स्पष्ट केले आहे. म्हणुन "अथ" या शब्दाने आम्ही आता या भक्तिच्या व्याख्यानास सुरुवात करतो असाही अर्थ घेणे योग्य होईल. सुत्रातील दुसरे पद "अतः" हे आहे "अतः" शब्दाचे दोन अर्थ होतात. ते 'अंतःकरणात्, अतःप्रयोजनात् या कारणाने व या प्रयोजनाने अशा दोन अर्थात अतः शब्दाचा व्यवहार होतो. भक्तिच्या व्याख्यानाचा म्हणजे सर्व मानवांना भगवद्भक्तीकडे प्रवृत्त करण्याचे कारण काय हा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे उत्तर हे कि ,सर्व मानवप्राणी संसारात गुंतले आहेत, कोणाची कोणत्या न कोणत्या सांसारिक भोगात आसक्ती दिसुन येते. कोणी धन, कोणी ऐश्वर्य कोणी पत्नीपुत्रादि तसेच कोणी जातिधर्म, समाज, राष्ट्र यांची कोणत्यातरी प्रकारे भक्ति करत असतात. पण या भोगासक्ति, वैभवासक्ति, सत्तालालसा इत्यादिकांनी कधी कोणास सुखशांती प्राप्त होणे शक्य आहे काय? ही भोगवासना कामक्रोधादि विकार वाढविते व ते किती बाधक आहेत हे श्री नारद महर्षी पुढे सुत्र 44, 45 मध्ये स्पष्ट सांगणारच आहे. उर्वरित भाग पुढील अंकात श्रीगुरू चरणी समर्पित 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 *संकलन* *नारद भक्तिसुत्र* *ह.भ.प. रामभाऊ महाराज नादीकर* *मो.8007272974 / 9284252201* *१७,१०,२१,रवि.s.n.b.1:41 pm. plg.*

🌹🌹 *नारद भक्तिसुत्र* 🌹🌹
         *सुत्र- 1*

        *भाग- 1*

*अथातो भक्तिं व्याख्यास्यामः!  !! 1 !!*
सर्व वाचकांना विनम्र सुचना आहे. आजपासून दररोज नारद भक्तिसुत्रावर लेख देणार आहोत तरी सर्व वाचकांनी याचा आनंद घ्यावा.
भक्तिसुत्राचा विचार केला तर भगवान व्यासांनी सुत्राची निर्मिती केलेली आहे. व्यासनिर्मित पाचशे पंचावन्न सूत्र आहे. गर्गाचार्यांनी सुत्राची निर्मिती केलेली आहे व शांडिल्य मुनींनी सुध्दा भक्तिसुत्राचे लिखाण केलेले आहे परंतु कालपरत्वे काहि महात्म्यांची सुत्रे लोप पावली आहेत. नारदजींनी जे सुत्र लिहिले आहेत ते देवर्षी नारद यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत भक्ति कशी असावि हे जर समजुन घ्यायचे असेल तर नारदभक्तिसुञ हे आचरणात उतरविले पाहिजे, कारण भक्तीचे ऊच्च कोटीतील जाणकार अनुभवी नारदापेक्षा दुसरे कुणीच सापडणार नाहीत. जे रात्रंदिवस भगवंताचे नामस्मरण करत होते *नारायण नारायण! पारायण हे करी!!* हि अवस्था नारदजींची होती. 
सुत्रांचा आरंभ करत असताना नारदजींनी *अथातो भक्तिं व्याख्यास्यामः!* या सुत्राने आरंभ केलेला आहे. परंतु नियम असा आहे कि कुठलेही कार्य करत असताना किंवा कोणताही ग्रंथारंभ करताना मंगलाचरण हे करायलाच पाहिजे. शास्त्रात मंगलाचरणाचे तीन प्रकार आहेत;  
आशिर्वादरुप मंगलाचरण, नमस्काररुप मंगलाचरण आणि वस्तुनिर्देशरुप मंगलाचरण या वस्तुनिर्देशरुप मंगलाचरणाचे दोन प्रकार आहेत. सगुणवस्तुनिर्देशरुप मंगलाचरण आणि निर्गुणवस्तुनिर्देशरुप मंगलाचरण.
परंतु नारदजींनी भक्तिसुत्राची सुरुवात करताना *"अथ भक्तिं व्याख्यास्यामः!* या सुत्राने केली आहे. या सुत्राचा अर्थ "अथ- (आता) अतः (म्हणून) , भक्तिं- भक्तिचे; व्याख्यास्यामः- आम्हि व्याख्यान करत आहोत. 
या सुत्राचा आरंभ "अथ " या शब्दाने केला, हा शब्द मंगलाचरणात येत नाहि परंतु मंगलवाचक आहे. त्याचे कारण पुढील श्लोकात आहे. 
*ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रम्हणः पुरा!*
*कंठं भित्त्वा विनिर्यायातौ तेन माङ्गलिकावुभौ!!*
सृष्टिच्या आरंभी भगवंताच्या नाभीकमलापासुन उत्पन्न झालेल्या ब्रम्हदेवाच्या कंठातुन प्रथम 'ॐ' आणि 'अथ' हे दोन शब्द निर्माण झाले म्हणून ते दोन्ही मंगलवाचक मानले गेले. अथ शब्दाचा अर्थ कोशात मंगल असा नाही , पण अथ शब्दाचा उच्चार होताच मंगलवाद्य ध्वनिश्रवणाप्रमाणे मंगलभाव प्रगट होतो. म्हणून अनेक दर्शनांची जी सुत्रे आहेत त्यांचा आरंभ "अथ "या शब्दाने झालेला आहे. "अथातो ब्रम्हजिज्ञासा " , अथातो धर्मजिज्ञासा, अथातो धर्म व्याख्यास्यामः , अथ योगानुशासनम्, इत्यादि 
परंतु देवर्षी नारदांसारखे व्याख्यान करणारे आणि भक्तिसुत्रासारखा विषय, या सुत्रात अमंगल काहि राहाणारच नाहि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अथ शब्दाचे आरंभ, अधिकार व अनंतर हे तीन अर्थ आहेत. अधिकार असा अर्थ घेतला तर इतर साधनांना जसा पूर्वी साधनाचरण होऊन अधिकार प्राप्त होतो. उदाहरणार्थ धर्माचरण करणाऱ्याला वेदाध्ययनाने अधिकार प्राप्त होतो . ज्ञानाचा अधिकार विवेक- वैराग्यदि अंतरंग साधनाचरणाने प्राप्त होतो. योगसमाधिचा अधिकार यमनियमादिकांनी सिध्द होतो, तसे भक्ति हे साधन करण्यापुर्वी इतर कोणत्याहि साधनाची ती अपेक्षा ठेवीत नाही. विहित कर्मे करण्यास त्रैवर्णिक अधिकारी आहे. यज्ञयागादि करण्यास ग्रहस्थाश्रमी अधिकृत आहे. तसा येथे वर्णआश्रम, जाति अवस्था, वय इत्यादी कोणतीही अधिकार लागत नाही. मनुष्य देहात आला तो भक्तिचा अधिकारी होतो एखादा भक्ति करत नसेल तर तो पुरुषापराध होय. पण तो अधिकारी नसतो असे नाही . म्हणून "अथ" पदाचा अर्थ अधिकार असे घेता येत नाही. 
तसेच अनंतर हाही अर्थ उपयुक्त नाही. काहि साधने प्रथमतः इतर साधनाचरण करुनच केलि जातात. तसे भक्तिचे नाही . पुढे नारदांनी भक्ति स्वयंफलरुप आहे असे म्हटले आहे. तप, यज्ञक्रिया इत्यादी साधनांची भगवद्भक्तिपुर्वी अपेक्षा असते असे नाहि. कारण तप, यज्ञक्रियादिकांची पुर्तता नामस्मरणपूर्विका भक्तीनेच होते. हे पुराणादिकांतुन प्रसिद्ध आहे. सर्वसाधननिरपेक्ष भक्ति आहे. 
श्रीनारदमहर्षींनी अनेक ग्रंथ, स्मृति, पांचरात्र इ. निर्माण केले, पण त्यांच्याद्वारे सर्व मानवांचा उध्दार होईल असे नाही. कारण त्यात केलेला विचार सुक्ष्म व गुढ आहेव सांगितलेले साधने क्लिष्ट अशी आहेत. म्हणून वरील ग्रंथनिर्मिती नंतर सर्वजनसुलभ अशा भक्तियोगाचे रहस्य सर्वांना पटवून द्यावे, या हेतुने सुत्रांची रचना केलि. असा अर्थ होऊ शकेल. "अथ" शब्दाचा आरंभ असाही अर्थ घेणे योग्य होईल. कारण श्रीनारद महर्षी या सुत्रात आम्हि आता भक्तिचे व्याख्यान करतो अशी प्रतिज्ञा करतात. हे प्रतिज्ञा सुत्र म्हटले जाते. योग्य व श्रेष्ठ व्यक्तींनी केलेली प्रतिज्ञा प्रयोजन सिद्ध करणारी असते. ते प्रयोजन पुढील चौथ्या- पाचच्या सुत्रातुन स्पष्ट केले आहे. म्हणुन "अथ" या शब्दाने आम्ही आता या भक्तिच्या व्याख्यानास सुरुवात करतो असाही अर्थ घेणे योग्य होईल. 
सुत्रातील दुसरे पद "अतः" हे आहे "अतः" शब्दाचे दोन अर्थ होतात. ते 'अंतःकरणात्, अतःप्रयोजनात् या कारणाने व या प्रयोजनाने अशा दोन अर्थात अतः शब्दाचा व्यवहार होतो. भक्तिच्या व्याख्यानाचा म्हणजे सर्व मानवांना भगवद्भक्तीकडे प्रवृत्त करण्याचे कारण काय हा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे उत्तर हे कि ,सर्व मानवप्राणी संसारात गुंतले आहेत, कोणाची कोणत्या न कोणत्या सांसारिक भोगात आसक्ती दिसुन येते. कोणी धन, कोणी ऐश्वर्य कोणी पत्नीपुत्रादि तसेच कोणी जातिधर्म, समाज, राष्ट्र यांची कोणत्यातरी प्रकारे भक्ति करत असतात. पण या भोगासक्ति, वैभवासक्ति, सत्तालालसा इत्यादिकांनी कधी कोणास सुखशांती प्राप्त होणे शक्य आहे काय? ही भोगवासना कामक्रोधादि विकार वाढविते व ते किती बाधक आहेत हे श्री नारद महर्षी पुढे सुत्र 44, 45 मध्ये स्पष्ट सांगणारच आहे. 

 उर्वरित भाग पुढील अंकात 
श्रीगुरू चरणी समर्पित 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

*संकलन*
*नारद भक्तिसुत्र*
*ह.भ.प. रामभाऊ महाराज नादीकर*
*मो.8007272974 / 9284252201*

*१७,१०,२१,रवि.s.n.b.1:41 pm. plg.*

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 16 शेयर

कामेंट्स

+57 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 37 शेयर
Mamta Chauhan Dec 6, 2021

+9 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 0 शेयर
AMIT KUMAR INDORIA Dec 6, 2021

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 1 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Mohan Patidar Dec 6, 2021

+11 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 0 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Ravi Kumar Taneja Dec 6, 2021

*🙏🔱🙏जय श्री महाकाल 🙏🔱🙏* काशी विश्वनाथ के नव निर्मित भव्य: प्रभु भोलेनाथ के मंदिर परिसर के दर्शन कीजिए 🙏🌿🙏 🔱कर्पूर गौरमं कारुणावतारं, संसार सारम भुजगेंद्र हारम ! सदा वसंत हृदयारविंदे, भवम भवानी साहितम् नमामी!!🔱 *🔯मित्र, पुस्तक, रास्ता,* *और विचार* *गलत हों तो गुमराह कर देते हैं,* *और यदि सही हों तो* *जीवन बना देतें है* 🙏🌹🙏 🔱आशुतोष शशाँक शेखर,चन्द्र मौली चिदंबरा, कोटि कोटि प्रणाम शम्भू, कोटि नमन दिगम्बरा !!🔱 🔱ॐ नमः शिवाय...🔱 🔱हर हर महादेव🔱 🌹प्रभु भोलेनाथ के आशीर्वाद से आप सदा खुश रहें, मस्त रहें, मुस्कुराते रहें तथा स्वस्थ रहें!!!🙏🌼🙏 🔯दुनिया में इंसान को हर चीज मिल जाती है,लेकिन अपनी गलती नही मिलती ! जो लोग अपनी गलती स्वीकार कर लेते हैं, उनके जीवन में सदैव सुख-शांति, प्रसन्नता बनी रहती है !! 🔱जय श्री महाकाल 🔱 🕉🔱🙏🌿🙏🔱🕉

+24 प्रतिक्रिया 11 कॉमेंट्स • 22 शेयर
Gd Bansal Dec 6, 2021

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Shanti pathak Dec 6, 2021

+14 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 8 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB