BHARAT NIRMAL Oct 1, 2022

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आजचा दिनविशेष. १ ऑक्टोबर १९१९. विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक, गीतरामायणकार महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील 'शेटफळे' या गावी त्यांच्या आजोळी झाला. गदिमांना जन्मताच मृत घोषित करण्यात आले होते कारण ते रडले नव्हते.शेवटचा प्रयत्न म्हणून सुईणीने शेगडीसाठी केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबीजवळ नेला,आणि काय आश्चर्य बाळाने टाहो फोडला आणि या महाकवीचा पुर्नजन्म झाला.त्यांचे बालपण अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीमध्ये 'माडगुळे' या गावात गेले. गदिमांचे वडिल औंध संस्थानात कारकून होते. त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात काम करायला सुरुवात केली. लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी १९३८ साली आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली खूप लिहावेसे वाटू लागले. त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली.नंतर राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत (तीन चित्रकथा. गदिमांनी स्वातंत्रलढयातही भाग घेतला होता. खूप मोठया कुटुंबाची जबाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र्य, यामुळे गदिमांनी स्वातंत्रलढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने, पोवाडे लिहून जनजागृती केली. सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते. त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके....... कविता–जोगिया , चार संगीतिका, काव्यकथा , गीत रामायण ,गीत गोपाल ,गीत सौभद्र . कथासंग्रह–कृष्णाची करंगळी , तुपाचा नंदादीप , चंदनी उदबत्ती कादंबरी–आकाशाची फळे आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस आणि वाटेवरल्या सावल्या . माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो.त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला. गदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मिकी' ही पदवी ज्याच्यामुळे प्राप्त झाली ते महाकाव्य म्हणजे गीतरामायण. 'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे. गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे. गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी आहेत. चित्रपटतंत्राची त्यांची अत्यंत सूक्ष्म जाण त्यांतून लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत पुढचं पाऊल (पटकथा, संवाद, गीते ), बाळा जो जो रे, लाखाची गोष्ट , पेडगावचे शहाणे , ऊन पाऊस , मी तुळस तुझ्या अंगणी , जगाच्या पाठीवर , संथ वाहते कृष्णामाई ह्यांचा समावेश होतो. (कथा, पटकथा, संवाद, गीते त्यांपैकी सर्व वा काही). तुफान और दिया (१९५६), दो आँखे बारह हाथ (१९५७), गूँज उठी शहनाई (१९५९) हे त्यांनी लिहिलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपट. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. त्यांच्या लेखणीतून असंख्य प्रकारची गाणी झरली.त्याची एक झलक....... गोरी गोरी पान एका तळ्यात होती बदके पिले सुरेख मामाच्या गावाला जाऊया नाचरे मोरा आंब्याच्या वनात... 'झुक झुक झुक झुक अगीनगाडी, एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा का रे अबोला का रे दुरावा .. बुगडी माझी सांडली ग... रम्यही स्वर्गाहून लंका कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम हे राष्ट्र देवतांचे वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् जग हे बंदीशाळा या चिमण्यांनो परत फिरा रे, फड सांभाळ तुर्‍याला आला इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार ............ पुरस्कारांच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची. गदिमांना भारत सरकारने 'पद्मश्री' (१९६९) हा किताब बहाल केला. ते 'संगीत नाटक अकादमी' व 'विष्णुदास भावे सुवर्णपदक' या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९६२ ते १९७४ अशी सुमारे १२ वर्षे ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्यही होते. १९६९ ला ग्वाल्हेरला झालेल्या 'अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे' अध्यक्षपद, १९७३ साली यवतमाळ येथे भरलेल्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे' ते अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना कथा,पटकथा,संवाद,गीते लेखनासाठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाले. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे. गदिमांबद्ल लिहायचे म्हंटले तर अनेक पानेसुध्दा पुरणार नाहीत असे हेअष्टपैलू, बहुपेडी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या या विविध छटा चिमटीत पकडून ठेवणं शक्यच नाही.मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'अनभिषक्त सम्राटपद' निर्माण केले. मराठी चित्रपटात 'कथाकार', 'पटकथाकार', 'संवादलेखक', 'गीतकार', 'अभिनेता','निर्माता' अशा सर्व क्षेत्रात त्यांनी वावर केला. सुप्रसिध्द पटकथाकार व गीतकार 'गुलजार' गदिमांबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की 'मला ग.दि.माडगूळकर म्हणण्यापेक्षा 'गदिमा' हेच नाव जास्त आवडतं, कारण गदिमा म्हटलं की ते मला "मॉं की गोदी मे" सारखं वाटतं!! पु.ल.देशपांडे गदिमा पुरस्कार घेताना म्हणाले होते की "आपल्या मनात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे.". गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत. गदिमांच्या प्रतिभेसमोर विनम्र अभिवादन करुन नतमस्तक होताना एकच प्रश्न पडतो की इतकी अफाट प्रतिभा एकाच व्यक्तीला कशी बरं वश असावी?त्यांच्या प्रतिभेला शतशः प्रणाम!!!! माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

0 कॉमेंट्स • 11 शेयर

!! श्री स्वामी समर्थ !! 🌹 देवी नामावली :- -------------------- ॥ अथनामावली ॥ आदिशक्तये । महादेव्यैन । अंबिकायै । परमेश्वर्यै । ईश्वरै । योगिन्यै । योगायै । सर्वभूतेश्वर्यै । जयायै विजयायै ॥१०॥ शांभव्यै । शक्त्यै । बाह्म्यै । ब्रह्मांडधारिण्यै मोहिन्यै । मोहरूपायै । महामायायै । माहेश्वर्यै । लोकरक्षणायै । दुर्गायै ॥२०॥ भक्तचिंतामण्यै । मत्यै । सिध्यै । मर्त्यै । महालक्ष्म्यै । सर्वसिद्धिप्रदायै । मंत्रमूर्त्यै । महाकाल्यै । सर्वमूर्त्रिस्वरूपिण्यै । वेदमूर्त्यैं ॥३०॥ वेदवर्त्यै । वेदांगायै । अव्यहारिण्यै । आद्यायै । भवगंत्यै । अरोध्ये । रुद्राण्यै । रुइरूपिण्यै । नारायण्यै । नारसिंहै ॥४०॥ नागयज्ञोपवीतिन्यै । शंखचक्रगदाधारिण्यै । जटामुकुटशोभिन्यै । अप्रमाणायै प्रमाणायै । आदिमध्यावसनायै । पुण्योदयायै । पुण्यकीर्त्यै । स्तुताय ॥५०॥ विश्वमात्रे । विशालाक्षायै । गंभीरायै । करुणान्वितायै । कालरात्रयि  । कामसिद्धै । कमलायै । पद्मवासिन्यै । मात्रे मातंगिन्यै ॥६०॥ चंडमुडवधायै । धात्र्यै । दैत्यदानवनाशिन्यै । मोघद्योत्ये । मेघमालायै । सिद्धै । मनोयोगिन्यै । सत्त्वधारिण्यै । आत्मज्योत्ये । परमज्योतिषे ॥७०॥ सर्वज्योत्यै । स्वरूपिण्यै । सहस्रमूर्त्यै । सावर्ण्यै । आयुर्लक्ष्म्यै । धनुर्लक्ष्म्यै । विद्याक्ष्म्यै । विचक्षणायै । सर्वलक्ष्मिपदारूपायै । क्षीरार्णववासिन्यै ॥८०॥ वागैश्वर्यै । वाक्सिद्धायै । अज्ञानघायै । गोचर्यै । बलायै । परमकल्याणै । भानुमंदलवासिन्यै । अव्यक्तायै । व्यक्तरूपायै । अनंतरूपिण्यै ॥९०॥ चंद्राननायै । चंद्रजटायै । चंद्रमंडलमंडितायै । भैरव्यै । परमनंदायै । अनंतायै । अपराजितायै । ज्ञानदेव्यै । ज्ञानवर्तायैं । ज्ञानमूर्त्यै ॥१००॥ कलावत्यै । स्मशानवत्यै । चामुंडायै । घोर दारिद्र्यनाशिन्यै । महिषासुरघ्न्यै । सर्वरक्षायै । ह्रियै । श्रियै । महाकाल्यै । महालक्ष्म्यै । महासरस्वत्यै । श्रामहाकाल्यै महालक्ष्म्यै । महासरस्वत्यैनमः ॥ इति नामावली समाप्तः ॥

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

*भारतातील शिल्पधन* शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आज १  आॅक्टोबर. *आज आपण भेट देणार आहोत तुमकुर मधील आणखी काही प्रेक्षणीय स्थळांना*... *मंदारगिरी टेकडी जैन मंदिर*... तुमकूरमधील मंदारगिरी हिल्स हे सुंदर जैन मंदिरासाठी प्रसिध्द आहे.मंदारगिरी हिल्स हे कर्नाटकातील जैन धर्मासाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. टेकडी, ज्याला स्थानिक पातळीवर बासादी बेट्टा देखील म्हणतात. ४५० कोरीव पायर्‍या चढून गेल्यावर आपण टेकडीच्या शीर्षस्थानी पोहोचतो.शिखरावर चार मंदिरे आहेत जी १२व्या ते १४व्या शतकात बांधली गेली आहेत. शेजारीच एक लहान तलाव देखील आहे.  टेकड्यांचे सर्वात प्रसिद्ध आर्किटेक्चर - पिंचीच्या आकाराचे ८१-फूट उंच गुरू मंदिर अतिशय देखणे आणि सुबक आहे .हे मंदिर पिसाच्या आकाराच्या घुमटावर निळ्या, हिरव्या आणि नारिंगी रंगाच्या सर्व चमकदार रंगांनी रंगवलेले असल्यामुळे खूप  सुंदर दिसते. *येडियुर सिद्धलिंगेश्वर स्वामी मंदिर* - ह्या मंदिराचे  तोंड उत्तरेकडे असून ती एक मोठी द्रविड रचना आहे. मंदिरात श्री सिद्धलिंगेश्वर स्वामींचे 'गद्दीगे', विभूतीचे एक गठ्ठे, लिंग कान्हे रूपाने झाकलेले आहे. याच्या वर एक धातूचे शिल्प (उत्सव मूर्ती) ठेवलेले आहे जे मिरवणुकीत वापरले जाते. धातूची प्रतिमा मुख्य दरवाजावरील दगडी शिल्पाशी साम्य दर्शवते. मंदिरात एक मोठा लाकडी रथ  आहे. मंदिराच्या महाद्वाराजवळ (मुख्य दरवाजा) काही शिलालेख आहेत जे शिक्षकांच्या आध्यात्मिक महानतेचे वर्णन करतात. मंदिराच्या सुंदर रंगीत 'गोपुरा'मध्ये श्री सिद्धलिंगेश्वर स्वामींच्या जीवनातील विविध घटनांचे चित्रण आहे. मंदिरातील घंटा, दागिने, पात्रे इत्यादींवरही काही शिलालेख सापडतात. मुख्य गर्भगृहाच्या तळघरात श्री वीरभद्र स्वामींचे एक छोटेसे मंदिर आहे ज्यांना श्री सिद्धलिंगेश्वर स्वामींप्रमाणेच लोक मोठ्या आदराने पाहतात . *पंचमुखी अंजनेय* .. ही १६१ फूट उंचीची एक भव्य सोन्याचे रंग असलेली मूर्ती आहे जी खरोखरच पाहण्यासारखी आहे! शिल्पकारांचे एक गौरवशाली कलात्मक कार्य, पंचमुखी अंजनेय हे हनुमानाचे एक विशेष रूप आहे, ज्याने जगाच्या कल्याणासाठी आपले रूप धारण केले होते. *आता उद्या पाहू कुठे जायचे*... माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

0 कॉमेंट्स • 12 शेयर
Anil Oct 1, 2022

+37 प्रतिक्रिया 15 कॉमेंट्स • 65 शेयर
Anil Oct 1, 2022

+18 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 69 शेयर
Anil Oct 1, 2022

+54 प्रतिक्रिया 16 कॉमेंट्स • 167 शेयर
Anna Shinde Oct 1, 2022

+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 14 शेयर
Anna Shinde Oct 1, 2022

+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 8 शेयर

ll *श्रीराम जय राम जय जय राम* ll 🚩 *श्रीब्रह्मचैतन्य महाराज* *गोंदवलेकर* 🚩 🌸 *यांचे प्रवचन - १ ऑक्टोबर* 🌸 *उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहे.* उत्सवासाठी तुम्हा सर्वांना बरेच कष्ट् झाले. लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला, म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी होईपर्यंत, थोडाच वेळ लागतो; पण या संस्काराचे महत्व आणि गांभीर्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे सोहळे करतात. त्याचप्रमाणे, उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हे मुख्य आहे बाकी आनंद आणि उत्साह हे त्याला पोषक म्हणून असावेत. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठी आहे. देवदेवतांच्या उत्सवाचा हेतूही भगवंताचे प्रेम वाढीला लागावे हाच आहे. दिवाळीमध्ये फटाके उडवणे, गोड खाणे, फराळ करणे, या सर्व गोष्टी मागचे दुःख विसरण्यासाठी म्हणून आहेत. उत्सव काय, सण काय, धार्मिक कृत्ये काय, तीर्थक्षेत्रे, पूजापठण, इत्यादि सर्वांचे कार्य भगवंताचे प्रेम मिळवणे हेच मुख्यतः आहे. आपल्या हातून घडणारे प्रत्येक कर्म भगवंताच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, म्हणजे हवे नकोपण नाहीसे होऊन, त्याच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल. देवाचे प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे. आपण भुताखेतांवर आपला विश्वास नाही असे म्हणतो; पण करणी केलेला कुणी माणूस भेटला असताना किंवा पछाडलेला माणूस बघितल्यावर, आपल्याला त्याची भीती उत्पन्न होते. जी भीती आपल्याला भुताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर आपल्याला प्रेम कसे उत्पन्न होणार ? तेव्हा देवाबद्दलची भीती मनातून कढून टाका. देव कधीही कोणाचे वाईट करणार नाही याची खात्री बाळगा. परमेश्वर दयेचा सागर आहे. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माउलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा, गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल ह्यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल. नाम हे भगवंताला अत्यंत जवळचे आहे. या नामाची तुम्ही संगत धरा, त्याचा सतत सहवास ठेवा, त्याला प्राणापलीकडे जपा; मग हेच नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत पोहोचविल्याशिवाय राहणार नाही. जिथे राम तिथे नाम, आणि नाम तिथे राम. खरोखर तुम्ही नामात दंग होऊन स्वतःला विसरा, मग राम तुमच्यापुढेच उभा आहे. *२७५. दृश्यामध्ये असणारी भगवंताची खूण म्हणजे नाम होय. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे.* ll "श्रीराम जय राम जय जय राम " ll

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 11 शेयर
Nishant Oct 1, 2022

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 7 शेयर
Anna Shinde Oct 1, 2022

1 कॉमेंट्स • 2 शेयर